HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

नगरमध्ये सुजय विखेंविरोधात राष्ट्रवादीकडून संग्राम जगताप यांना उमेदवारी

अहमदनगर | विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांनी काहीच दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर आता अहमदनगरमधून राष्ट्रवादीकडून सुजय विखे पाटील यांच्याविरोधात आता आमदार संग्राम जगताप यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये अहमदनगरमध्ये कडवी लढत पाहायला मिळेल. संग्राम जगताप यांनी अहमदनगरच्या महापौरपदाच्या निवडणुकीत आपल्याच पक्षातील वरिष्ठांना न जुमानता भाजप उमेदवाराला मदत केली होती.

अहमदनगरमध्ये पक्षश्रेष्ठींच्या नकाराला न जुमानता राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपला मदत केली होती. त्यामुळेच अहमदनगरच्या महापालिका निवडणुकीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या भाजप उमेदवार राष्ट्रवादीच्या महापौर झाला होता. या रणनीती सर्वात मोठा वाट होता तो म्हणजे संग्राम जगताप यांचा. त्यांच्या या रणनीतीमुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह पक्षातील अन्य मोठ्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी सर्व नगरसेवकांना नोटीस बजावली तसेच याबाबत 18 नगरसेवकांवर कारवाई देखील करण्यात आली. यावेळी संग्राम जगताप यांना अभय देण्यात आले होते.

Related posts

सध्याचे सरकार लोकांच्या कॉम्प्युटर व मोबाईलवरसुद्धा हेरगिरी करत

News Desk

#LokSabhaElections2019 : अखेर ‘संयुक्त पुरोगामी महाआघाडी’ची अधिकृत घोषणा

News Desk

धनगर समाजाला आदिवासी समाजाप्रमाणे सवलती मिळणार | मुख्यमंत्री

News Desk