HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

#LokSabhaElections2019 : …आता दुसरी परीक्षा तुमची आहे दानवे !

मुंबई | भाजप-शिवसेनेच्या औरंगाबाद येथे आज (१७ मार्च) झालेल्या शिवसेना-भाजपच्या बैठकीत शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी अखेर जालन्यातून माघार घेतली आहे. “पहिली परीक्षा माझी झाली आता दुसरी परीक्षा तुमची आहे दानवे”, असे सूचक विधान शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले आहे. तर दुसरीकडे “जसे शिवसेना भाजप फेविकाॅलचा मजबूत जोड झाला आहे. तसेच अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे होतील”, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

गेले अनेक दिवस जालना लोकसभा मतदार संघावरून भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यात वाद सुरु झाला होता. अनेक बैठकांनंतरही जालन्याच्या या मतदारसंघांचा तिढा सुटता सुटत नव्हता. मात्र, अखेर आज औरंगाबादच्या बैठकीनंतर याबाबतचा स्पष्ट झाला असून जालना मतदारसंघातून अखेर अर्जुन खोतकर यांनी माघार घेतली आहे.

जालना मतदारसंघाचा तिढा सोडविण्यासाठी अर्जुन खोतकर यांनी शनिवारी (१६ मार्च) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर भेट घेतली होती. यावेळी महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे या समन्वयक म्हणून उपस्थित होत्या. “रविवारी औरंगाबाद येथील बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अंतिम निर्णय होईल”, असे खोतकर यांनी स्पष्ट केले होते.

Related posts

बाळासाहेबांच्या स्मृती दिनानिमित्त वाळू शिल्पातून राम मंदिराचा मुद्दा उपस्थित

News Desk

मोदी-शहांना मोठा धक्का, एनडीएतून आणखी एक पक्ष बाहेर पडणार ?

News Desk

भारतीय क्रिकेट टीमचे दिग्गज फलंदाज निवडणुकीच्या पिचवर

अपर्णा गोतपागर