नवी दिल्ली | आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता भाजपने आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. भाजपच्या या यादीत ४२ नावांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यासह भाजपच्या अन्य अनेक नेत्यांचा या यादीत समावेश आहे. दरम्यान, भाजपने ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांची नावे स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळल्याने भाजपवर सडकून टीका देखील होत आहे.
BJP releases list of 42 star campaigners for phase 1 and 2 of #LokSabhaElections2019 from Bihar. pic.twitter.com/xdcS3U9rU7
— ANI (@ANI) March 26, 2019
भाजपने आपल्या वरिष्ठ नेत्यांना त्यांच्या वयाचे कारण उमेदवारी देखील नाकारली आणि आता त्यांना स्टार प्रचारकांच्या यादीतूनही बाद केल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. लालकृष्ण अडवाणी यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या गांधीनगर मतदारसंघातून भाजपने अमित शाह यांना उमेदवारी जाहीर केली. तर भाजपचे सरचिटणीस श्री रामलाल यांनी मला मी कानपूर किंवा इतरत्र कुठूनही आगामी लोकसभा निवडणुका लढू नये, असे सांगितल्याचे आज (२६ मार्च) मुरली मनोहर जोशी यांनी देखील स्पष्ट केले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.