HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

#LokSabhaElections2019 : आम्ही लोकांसाठी एकत्र आलो, आम्हाला गोरगरीबांसाठी सत्ता हवी !

औरंगाबाद | औरंगाबादमध्ये आज (१७ मार्च) शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. “शिवसेनेने कधीही मागून वार केले नाहीत. आम्ही वारही समोरून केले आणि दोस्तीही समोरून केली. शिवसेनेने कधीही आपले मतभेद राज्याच्या हिताआड येऊ दिले नाहीत”, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटले.

“युतीने न लढता आपण वेगवेगळे लढत होतो तेव्हा विरोधकांना माज चढला होता. परंतु, युती झाल्यानंतर आता कुठेही त्यांच्या सभा झाल्या नाहीत. आपण सत्तेपेक्षाही लोकांसाठी एकत्र आलो आहोत. आम्हाला सत्ता गोरगरीबांसाठी हवी आहे”, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. अनेक दिवसांपासून निर्माण झालेला जालना मतदारसंघाचा तिढा सोडविण्यातही शिवसेना-भाजपला यश आले आहे, असे म्हणावे लागेल. शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी माघार घेतल्याने भाजप प्रदेशाध्यक्ष दानवे यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे :

 • इथे येईपर्यंत अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्याबाबत चर्चा होती.
 • महाभारतातल्या अर्जुनाप्रमाणे या अर्जुन खोतकर यांना देशद्रोह्याचा डोळा दाखवला.
 • युतीने न लढता आपण वेगळे लढत होतो तेव्हा विरोधकांना माज चढला होता. परंतु, युती झाल्यानंतर आता कुठेही त्यांच्या सभा झाल्या नाहीत.
 • संघर्ष झाला तो झाला, परंतु आता युतीची जबाबदारी आम्हा दोघांच्या खांद्यावर
 • मराठवाडा हा भगव्याचा बालेकिल्ला. संभाजीनगरचा हिंदु हा कडवट.
 • आघाडीचे हातात हात आणि तंगड्यात तंगडं, त्यामुळे ते आता पडणारच
 • शिवसेनेने कधीच मागून वार केले नाहीत. आम्ही वारही समोरून केले आणि दोस्तीही समोरून केली.
 • मतभेद कधीही शिवसेनेने राज्याच्या हिताच्या आड येऊ दिले नाहीत
 • मुंबईकरांना ५०० स्क्वेअरफूट घरांचा मालमत्ता कर माफ करू, हे वचन पाळले
 • नाणार इथला प्रकल्प रद्द केला.
 • युती झाली आता जनतेचे आशीर्वाद मिळवण्याची वेळ आहे.
 • एकवेळ मत मागून मिळतील, पण जनतेचे आशीर्वाद मागून मिळत नाहीत.

Related posts

बांगलादेशमध्ये हसीना यांचा चौथ्यांदा पंतप्रधान बनण्याचा मार्ग मोकळा

News Desk

इम्रान खानच्या गुगलीवर सुषमा स्वराज यांची बॅटिंग

News Desk

रजनीकांत यांचं राजकारण भगवं नसावं, | अभिनेता कमल हासन

Kiran Yadav