HW News Marathi
राजकारण

“शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात निष्ठावंतांना स्थान नाही”, आदित्य ठाकरेंचे टीकास्त्र

मुंबई | शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात निष्ठावंतांना स्थान नाही. जे निष्ठावंत सुरुवातीच्या टप्प्यमध्ये शिंदेंसोबत गेले. त्यांना शिंदे सरकारमध्ये स्थान नाही, अशी टीका शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली आहे.  राज्यात पावसाळी अधिवेशनाला आजपासून (17 ऑगस्ट) सुरू झाले आहे. यावेळी आदित्या ठाकरेंनी पुन्हा एकदा पक्षासोबत बंडखोरी करणाऱ्या गद्दार असे संबोधित केले. शिवसेनेची सर्वांनसाठी खुले असल्याचे माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरेंनी पुन्हा एकदा आवाहन केले

 

आदित्य ठाकरे म्हणाले, “सरकारने जे मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे. यावरून खरा मुख्यमंत्री कोण हे सर्वांना कळालेले आहे. दुसरे म्हणजे जे अपक्ष शिंदेंबरोबर गेलेले आहेत. त्या अपक्षांना मंत्रिमंडळात कुठेही स्थान मिळालेले नाही. जो खरा सत्ताधारी पक्ष आहे. जे गद्दार आहेत, त्यांच्यातील नाही. अनेक चांगल्या काम करणाऱ्या महिला आहे, अशा महिलांना मंत्रिमंडळात कुठेही स्थान मिळालेले नाही. मुंबईकरांना स्थान मिळालेले नाही. ना मुंबईचा आवाज ऐकला ना, महिलांचा आवाज ऐकला. ना अपक्षांचा कुठे तरी आवाज आहे. आपण खरे जर पाहिले तर जे पहिल्या 13-14 निष्ठवंत जे शिंदेबरोबर  गेले होते. त्या आमदारांना देखील मंत्रिमंडळात स्थान नाही.  म्हणजे शिंदे सरकारने पुन्हा एकदा दाखविले की, निष्ठावंतांना त्यांच्या मनात कुठेही स्थान नाही.”

 

शिंदे सरकारमध्ये मंत्रिमंडळातील बहुतेक जणांचे डिमोशन झाले

शिंदेंबरोबर पहिले जे लोक गेले होते, त्यांना मंत्रिमंडळात स्थान नाही, त्या लोकांना आदित्य ठाकरेंशी संपर्क साधा, पत्रकारांच्या प्रश्नावर आदित्य ठाकरे म्हणाले, “ज्यांना स्थान मिळले आहे, आणि ज्या आमदारांना स्थान मिळले त्यांचे बहुतेक जणांचे डिमोशन झाले आहे. आमच्याकडे होते, ते बरे होते. संपर्क सतत असतो. पण, महत्वाची गोष्ट हीच आहे की, तिकडे जाऊन ते अडकलेले आहेत, ते फसलेले आहेत. आणि ते नजर कैदेत आहेत. त्यांच्या मनात प्रश्न असेल की आमच्यासाठी दरवाजे खुले आहेत की नाही. मी त्यांना हेच सांगेन की सगळ्यांसाठी दरवाजे खुले आहेत. त्यांना तिथे राहायचे असेल ते त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्या. आणि निवडणुकीला सामोरे जावे.

उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर घुपसले

बिहारमध्ये जे नितीश कुमार यांना जे जमले, ते महाराष्ट्रमध्ये उद्धव ठाकरेंना जमले नाही, अशी चर्चा पत्रकारांच्या प्रश्नावर आदित्य ठाकरे म्हणाले, “आम्ही 2019मध्ये सत्तांतर दाखविले आहे. आणि आम्ही देशाला हा पर्याय दाखविलेला आहे. दुर्दैवाने आमच्यातील काही गद्दार निघाले. त्यांनी एका चांगल्या माणसाच्या पाठीत खंजीर घुपसले. ज्यांना उद्धवसाहेबांनी सगळे काही दिले. त्यांच्या पाठीत खंजीर घुपसले. ही ना कधी महाराष्ट्राची ना देशाची संस्कृती नव्हती. राजकारण मी मानत नाही. आणि हे जे झालेले आहे ते घाण्याडे राजकारण झालेले आहे. आणि हे दूर करण्याचे काम आम्ही आता करत आहोत.”

 

 

Related posts

“काही लोकं ‘ढळली’ पण खरी ‘अढळ’ लोकं माझ्यासोबत कायम”, उद्धव ठाकरेंचा शिवाजीराव आढळराव पाटलांना टोला

Aprna

पूनम महाजन विलफुल डिफॉल्टर, सचिन सावंत यांचा गंभीर आरोप

News Desk

शरद पवार यांची प्रचाराची भाषा खालच्या पातळीची !

News Desk