भोपाळ | काँग्रेसचे ज्येष्ठ नेता कमलनाथ यांनी आज (१७ डिसेंबर) मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. या शपथविधी सोहळ्यात नवनिर्वाचित मुख्यमंत्री कमलनाथ आणि काँग्रेसचे युवा नेता ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासोबत माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हात हातात घेऊन उंचावले आणि उपस्थितांना अभिवादन केले.
#WATCH Madhya Pradesh: Former CM Shivraj Singh Chouhan, Jyotiraditya Scindia and Kamal Nath at Nath's swearing-in ceremony in Bhopal. pic.twitter.com/KrTz5RB5JT
— ANI (@ANI) December 17, 2018
या शपथविधी सोहळ्यादरम्यान शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थिने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. या कार्यक्रमात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राजस्थानचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री अशोक गेहलोत, उपमुख्यमंत्री सचिन पायलट आदी नेते मंडळी शपथविधी सोहळ्यात उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेस आणि भाजपने एकमेंकावर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या आहेत. दोन्ही राज्यांच्या शपथविधी सोहळ्यात राजस्थानमध्ये पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात भाजप नेता आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया तर दुसऱ्याबाजुला तर मध्य प्रदेशमध्ये भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान या भाजपनेत्यांच्या उपस्थिने चर्चेला उधाण आले आहे.
Rajasthan: Former CM Vasundhara Raje, Congress leader Jitin Prasad and other leaders at the swearing-in ceremony of CM designate Ashok Gehlot and Deputy CM designate Sachin Pilot in Jaipur. pic.twitter.com/pQB5TOCVI6
— ANI (@ANI) December 17, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.