HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाकडे ६६० कोटींची संपत्ती

भोपाळ | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे चिरंजीव नकुलनाथ यांना आज (१० एप्रिल) छिंदवाडामधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. नकुलनाथ यांनी प्रतिज्ञापत्रात ६६० कोटींची संपत्ती असल्याचे नमूद केले आहे. नकुलनाथ यांच्याकडे ६१५.९ कोटींची जंगम मालमत्ता आहे, तर ४१.७७ कोटींची स्थावर मालमत्ता आहे. पत्नी प्रिया यांच्याकडे २.३० कोटींहून अधिक जंगम संपत्ती आहे. त्यांच्याकडे कोणतीही स्थावर संपत्ती नाही.

तसेच नकुलनाथ यांच्याविरोधात कोणत्याही प्रकारचा गुन्हा नाही. नकुल याच्यासोबत कमलनाथ यांनी देखील छिंदवाडा विधानसभा पोट निवडणुकीसाठी अर्ज भरला होता. त्यावेळी कमलनाथ यांनी अर्जात त्यांनी त्यांच्याकडे ४०.५ कोटींची जंगी मालमत्ता तर ८४ कोटींची स्थावर मालमत्ता असल्याचे जाहीर केले होती. या दोघांच्याही मालमत्ता एकत्र केल्या तर कमलनाथ यांच्या कुटुंबाकडे एकूण ८०० कोटींच्या जवळपास संपत्ती असल्याचे समजते.

 

Related posts

मुख्य समस्या ईव्हीएम किंवा व्हीव्हीपॅट नसून निवडणूक अधिकारीच | शरद पवार

News Desk

मुख्यमंत्र्यांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याची काँग्रेसची मागणी

News Desk

राज ठाकरे महाआघाडीसाठी हातकणंगले-सांगली मतदारसंघात घेणार सभा ?

News Desk