नवी दिल्ली | छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, मिझोराम आणि तेलंगणा या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तारखाची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. या पाचही राज्यात निवडणुकीची घोषणा होताच आज (६ ऑक्टोबर)पासून आचारसंहिता देखील लागू झाली असून या पाचही राज्यांचा निकाल ११ डिसेंबरला लागणार आहे. या पाचही राज्यांमध्ये मतदानासाठी व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
Model of conduct to come into force in Madhya Pradesh, Rajasthan, Chhattisgarh and Mizoram with immediate effect: Chief Election Commissioner OP Rawat in Delhi pic.twitter.com/db5PLnNGb9
— ANI (@ANI) October 6, 2018
जाणून घ्या…पाच राज्यात कशाप्रकारे निवडणुका होणार
छत्तीसगडमध्ये १२ आणि २० नोव्हेंबरला दोन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. मध्य प्रदेश आणि मिझोराम या दोन्ही राज्यात २८ नोव्हेंबरला एकाच टप्प्यात, तर तेलंगला आणि राजस्थानमध्ये ७ डिसेंबरला एकाच टप्प्यात मतदान घेण्यात येणार आहे. या पाचही राज्यांचा निकाल ११ डिसेंबरला लागणार आहे.
२०१३मध्ये या पाच राज्या किती मते मिळाली
२०१३च्या विधानसभा निवडणुकीत १६५ जागांनी भाजपला बहुमत मिळाले होते. विधानसभेत एकूण २३१ सदस्य असून त्यापैकी काँग्रेसचे ५७ तर बसपाचे चार आमदार आहेत. मध्य प्रदेशचे शिवराज सिंह चौहान हे मुख्यमंत्री आहेत.
राजस्थान
राजस्थान विधानसभेची एकूण सदस्यसंख्या २०० आहे. २०१३ साली निवडणुकीत भाजपने १६० जागांवर विजय मिळवत त्यांनी बहुमत मिळवले होते.
छत्तीसगड
छत्तीसगडमध्ये ९१ एकूण सदस्यसंख्या असून विधानसभा निवडणुकीत भाजपने २०१३ मध्ये ४९ जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेसने ३९ आमदार होते.
तेलंगणा
तेलंगणात एकूण – ११९ सदस्यसंख्या असून विधानसभेच्या निवडणुकीत टीआरएसने – ९०, काँग्रेस – १३, एमआयएम-७, भाजप-५, टीडीपी – ३ आणि सीपीआय (एम)ने – १ जागांवर विजय मिळवला होता.
मिझोराम
मिझोराममध्ये ४० सदस्यसंख्या असलेले राज्य असून काँग्रेसच्या हातात असलेले हे एकमेव राज्य आहे. मिझोराममध्ये विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसकडे ३४ जागा असून काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली होती.
#WATCH Election Commission of India briefs the media in Delhi https://t.co/Vq7bcikMU1
— ANI (@ANI) October 6, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.