नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदींची दुपारी १ वाजता अजमेर येथे रॅली असल्याने निवडणूक आयोगाने आपल्या पत्रकार परिषदेची वेळ बदलल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विटरवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
Facing criticism over allegedly deferring its presser to suit PM's rally, sources in EC said it was done to facilitate the journalists and poll body officers, who complained of inability to attend the presser at a short span of time.
Read @ANI story | https://t.co/dwMpo72fhm pic.twitter.com/m9WNztEiaT
— ANI Digital (@ani_digital) October 6, 2018
3 Facts- Draw your own conclusions.
1. ECI announces a PC at 12.30 today to announce elction dates to the 5 states.
2. PM Modi is addressing a rally in Ajmer, Rajasthan at 1 PM today.
3. ECI suddenly changes the time of announcement and PC to 3 PM.
Independence of ECI?
— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) October 6, 2018
भारतीय निवडणूक आयोग आज दुपारी पत्रकार परिषद घेणार असून या पत्रकार परिषदेत पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करणार आहे. यासाठीची पत्रकार परिषद पूर्वनियोजित वेळेनुसार दुपारी साडेबारा वाजता होणार होती. मात्र या पत्रकार परिषदेच्या वेळात अचानक बदल करून ही पत्रकार परिषद दुपारी ३.३० वाजता होणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. निवडणूक आयोगाच्या स्वातंत्र्यावर काँग्रेसने प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.