HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

महाराज…मठात जाऊन बसा, राजकारण तुमचे काम नाही !

सोलापूर | “देवदर्शनासाठी गेलात तरी देव बोलणार नाही. कारण बोलणारा देव मी आहे”, असे वक्तव्य करून सोलापूरमधील भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी आपल्यावर वाद ओढवून घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जयसिद्धेश्वर यांच्यावर टीका केली आहे. “नमस्कार महाराज, ही ५ रुपयांची नोट घ्या आणि मठात जाऊन बसा. राजकारण हे तुमचं काम नाही”, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ते सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारसभेत बोलत होते.

काँग्रेसकडून सोलापूर मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना तर भाजपकडून अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव वीरशैव मठाचे मठाधिपती असलेले डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी शिवाचार्य यांना उमेदवारी देण्यात आली आहे. जयसिद्धेश्वर यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्यावर सर्वच स्तरातून प्रचंड टीका होत आहे. “सोलापूरचे महाराज लोकांकडे मताचा शिक्का मागत आहेत. परंतु, साधू संत कोणाकडेच काहीही मागत नाहीत. जो मागतो तो संत असूच शकत नाही”, असेही शरद पवार यांनी यावेळी म्हटले आहे.

Related posts

मध्य प्रदेशाच्या निवडणुकीत पक्षांचे स्टार प्रचारक मैदानात

News Desk

शक्ती मिशन’चे संपूर्ण देशाला कौतुक, पंतप्रधानांवर आचारसंहिता भंग केल्याचा आरोप

News Desk

#LokSabhaElections2019 : अशोक चव्हाण यांच्यावर राजीनामा देण्याची वेळ ?

News Desk