HW News Marathi
राजकारण

महाराष्ट्रातील सत्तांतरावर सर्वोच्च न्यायालयावर आजच सुनावणी होणार

मुंबई | राज्यातील सत्तांतरावर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) काल होणारी सुनावणी आजवर ढकली होती. परंतु, न्यायालयात आजच (23 ऑगस्ट) दुपारी 12. 30 वाजता सुनावणी होणार असून हे प्रकरण न्यायालयाच्या पटलावर घेतले आहे. याआधी सत्तांतरावर सुनावणी दुसऱ्यांदा लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात होती.  न्यायालयात काल (22 ऑगस्ट)  न्यायाधीशांच्या खंडपीठातील एक न्यायाधीश हजर नसल्यामुळे ही सुनावणी आजवर ढकलली.

दरम्यान, न्यायालयाच्या आजच्या कामाच्या सप्लिमेंट्री लिस्टमध्ये राज्यातील सत्तांतर प्रकरणाचा समाविष्ट केला नव्हता. यामुळे आज होणारी सुनावणी पुन्हा एकदा लांबण्याच्या राज्यात रंगू लांगल्या आहेत. परंतु, आजच न्यायालयात सत्तांतरावर सुनावणी होणार असल्याचे निश्चित झाले आहे. आज होणाऱ्या सुनावणी न्यायालय हे प्रकरण खंडपीठाकडे सोपवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा हे 26 ऑगस्टला निवृत्त होणार आहे. त्याआधी राज्यातील सत्तांतरचा ऐतिहासिक फैला होणार की हे प्रकरण खंडपीठाकडे सोपवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या वतीने कपिल सिब्बल, आणि अभिषेक मनु सिंघवी वकील आहे. तर शिंदे गटाकडून हरीश साळवे न्यायालयात त्यांची बाजू मांडणार आहेत. तसेच निवडणूक आयोगाकडून अरविंद दातार बाजू मांडत आहेत.

 

या आहेत 5 याचिका
1) शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईविरोधात याचिका
2) शिंदे गटाचे प्रतोद गोगावले, गटनेते एकनाथ शिंदेंच्या मान्यतेविरोधात याचिका
3) एकनाथ शिंदे यांच्या शपथ विधी आणि विशेष अधिवेशनाविरोधात याचिका
4) राज्यपालांनी ठाकरे सरकारला विश्वासमताबाबत दिलेल्या निर्देशाविरोधातील याचिका
5) शिंदे गटाचे प्रतोद गोगावलेंच्या व्हीपचे शिवसेना आमदारांकडून उल्लंघन झाल्याविरोधात याचिका

 

संबंधित बातम्या

राज्यातील सत्तांतराची सुनावणी लांबणीवर; पुढील सुनावणी 22 ऑगस्टला होणार

Related posts

मुलायमसिंह यांचे आता वय झाले आहे !

News Desk

शिवसेनेकडून फोन आल्यानंतर मी मतदान केले !

News Desk

अयोध्येत गेल्याने त्या दोघांना ‘राम’ पावले असावेत !

News Desk