HW Marathi
राजकारण विधानसभा निवडणूक २०१९

#MaharashtraElections2019 | बीडमध्ये बोगस मतदानाचा आरोप, संदीप क्षीरसागर आक्रमक

बीड | विधानसभेसाठी राज्यभरात सोमवारी (२१ ऑक्टोबर) मतदान होत आहे. मात्र, बीड शहरातील एका मतदान केंद्रावर गोंधळ झाल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांनी बोगस मतदानाचा आरोप करत गोंधळ घातला. मतदारांना अडवून दमदाटी करण्यात आली. बीडमध्ये तसेच बोगस मतदानाचा असल्याचा आरोप करत संदीप क्षीरसागर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.बीडमध्ये काकाविरुद्ध पुतण्या ही फाईट होत असून काका जयदत्त क्षीरसागर यांच्यासमोर पुतण्या संदीप याने आव्हान उभे केले आहे. हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर राष्ट्रवादीचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांनी आपल्या काका जयदत्त क्षीरसागर यांना पराभव समोर दिसू लागल्याने पैसे वाटप केले जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. पैसे वाटणारे आणि घेणारा वर कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, पैसे कशासाठी वाटले जात होते, हे पोलिस तपासात निष्पन्न होणार आहे. या प्रकारावर पेठ बीड पोलिसांनी बोलण्यास नकार दिला.

संदीप क्षीरसागर काका-पुतण्यात पुन्हा आरोप-प्रत्यारोप

शहरातील बालेपीर मधील इंदिरा माध्यमिक विद्यालयातील मतदान केंद्रात होत असलेल्या मतदानाबाबत संदीप क्षीरसागर यांनी आरोप करत बोगस मतदान होत असल्याचा दावा केला. या बाबतीत थेट मतदारांना अडवून दमदाटी केली असे व्हिडिओमधून दिसत आहे. या बाबतीमध्ये मतदारांना आडवले आहे, मात्र तसे पाहिले तर या मतदारांचे नाव मतदार यादीत आहे. यामुळे हा गोंधळ नेमका कशामुळे झाला हे सांगण्यास प्रशासन तयार नाही.

संदीप क्षीरसागर यांनी केलेले आरोप पाटोदा मतदारसंघांमधून बीड मतदारसंघांमध्ये मतदानासाठी बोगस मतदार आणल्याचा दावा केला आहे.शिक्षण संस्थेवरील कर्मचारी यांच्यासह 20 लोकांची यादी दाखवत आहेत. मात्र या बाबतीत मतदार यादीत नाव असेल तर मतदानापासून रोखू नये, असे जिल्हाअधिकारी आस्तिक कुमार पांडे यांनी सांगितले आहे.

पैसे वाटताना एकाला रंगेहाथ पकडले, डिक्कीत सापडली रोकड

विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शहरात खंडेश्वरी मंदिराजवळ मतदारांना पैसे वाटताना एकास रंगेहाथ पकडण्यात आले होते. सुरेश बनसोडे असे या व्यक्तीचे नाव आहे. त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. त्याच्या स्कूटीच्या डिक्कीत लाखो रूपये आणि वाटलेल्या लोकांची यादी निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले.

खंडेश्वरी मंदिर परिसरात पैसे वाटप करणाऱ्या सुरेश बनसोडे यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पकडले. त्यानंतर पोलिसांना पाचारण करून या व्यक्तीस ताब्यात देण्यात आले. निवडणूक विभागाच्या भरारी पथकाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा सुरू केला असून या व्यक्तीकडे दोन हजार, पाचशे, शंभर रुपयांच्या नोटांचे बंडल आढळून आले.

 

Related posts

मुख्यमंत्र्यांच्या ‘राजकारण करु नका’ या उपदेशावर आशिष शेलार काय म्हणाले?

News Desk

आमच्या सरकारवर, मुख्यमंत्र्यांवर विठ्ठल प्रसन्न म्हणूनच…!

News Desk

महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांपैकी सुमारे २९५ जण कोरोनामुक्त

News Desk