HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

महात्मा ज्योतिबा फुले यांचे ‘शेतकऱ्यांचे आसूड’ हे पुस्तक नक्कीच प्रेरणादायी ठरेल! – उद्धव ठाकरे

मुंबई | विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा दि.१२ सप्टेंबर रोजी वाढदिवस असतो याचे औचित्य साधून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या निमित्ताने महात्मा फुले यांचे मुंडासे, शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक तसेच घोंडगी आणि काठी हे ठाकरे यांना डॉ. गोऱ्हे यांनी भेट दिली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या सातत्याने महाराष्ट्रात वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर गेली वीस वर्षे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बरोबर अतिसंवेदनशील पध्दतीने काम करत आहेत ते अधिक त्यांच्या हातून कार्य घडावे अशा प्रकारच्या शुभेच्छा नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे यांना दिल्या. यावेळी ठाकरेंनी नीलम गोऱ्हे यांना चांगल्या प्रकारचे सतत यश मिळावे व त्यांच्या हातून समाज हिताचे कार्य घडावे अशा शुभेच्छा दिल्या. शेतकऱ्यांचे आसूड हे पुस्तक नक्कीच प्रेरणादायी ठरेल अशा भावना ठाकरेंनी व्यक्त केल्या.

या प्रतिकात्मक भेटी मागची भूमिका स्पष्ट करताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या, महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्यांचे वाढते प्रमाण, एकाच वेळी ओला दुष्काळ आणि अपुरा पाणी पुरवठा याच्या कात्रीत सापडलेला शेतकरी आणि शेतीच्या सर्वांगीण विकासाकडे होणारे शासनाचे दुर्लक्ष; यावर उपाय म्हणून महात्मा फुल्यांनी तत्कालीन सामाजिक परिस्थितीवर ओढलेला आसूड आज परत हातात घेण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. या दृष्टीने गेली वीस वर्षे शेतकऱ्यांचे विविध प्रश्न अत्यंत संयमाने आणि संवेदनशीलतेने हाताळणाऱ्या  उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्याचा आसूड हातात घ्यावा अशी प्रार्थना यावेळी गोऱ्हे यांनी केली.

यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना नीलम गोऱ्हे यांनी महात्मा फुले यांच्या सामाजिक समतेच्या विचारांचे महत्व अधोरेखित करताना महाराष्ट्रात असलेल्या शेतकरी समस्या, स्त्री-सुरक्षा आदी विषयांवर लक्ष वेधले. यावेळी, शिवसेना पुणे शहर प्रमुख गजानन थरकुडे, उपशहरप्रमुख आनंद गोयल, प्रशांत राणे, महिला सहसंपर्क प्रमुख विजया शिंदे, महिला शहरसंघटिका सविता मते, माजी नगरसेविका संगीता ठोसर, पल्लवी जावळे, प्राची आल्हाट, युवासेना सहसचिव शर्मिला येवले आदी जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“हे काही रामराज्य आहे का?,” संजय राऊत मोदी सरकारवर संतापले

News Desk

सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, तर गरिबांना महिन्याला ६००० देणार !

News Desk

रोहित पवार विधानसभा निवडणूक लढवणार !

News Desk