HW News Marathi
राजकारण

नाशिक पदवीधर निवडणुकीत ‘मविआ’कडून शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर

मुंबई | नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या (Nashik Graduate Constituency) निवडणुकीत महाविकास आघाडीने अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) पाठिंबा जाहीर केला आहे. महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) नेत्यांची आज (19 जानेवारी) बैठक पार पडली. या बैठकीत शुभांगी पाटील यांना नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी पाठिंबा देणार यावर शिक्कामोर्तब झाला आहे. या बैठकीनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेतून ही माहिती दिली.

“पाच उमेदवार महाविकास आघाडीने पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या रिंगणात उभे केले आहे. आणि महाविकास आघाडी म्हणून या पाचही निवडणुका आम्ही जिंकू. या पद्धतीचे वातावरण संपूर्ण राज्यामध्ये आहे,” असा विश्वास नाना पटोलेंनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे.

 

Related posts

#मीटू मोहिमेला रामदास आठवलेंचा पाठिंबा

swarit

मोठ्या मतधिक्याने यंदाची निवडणूक जिंकणार, गडकरींचा विश्वास

News Desk

#NoMoreModi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आंध्र प्रदेशातील सभेपुर्वी विरोधकांची पोस्टरबाजी

News Desk