मुंबई | राज्यात सत्तासथापनेवरून भाजप-शिवसेनेत सुरु असलेला संघर्ष पाहता राज्याचा मुख्यमंत्री नेमका कोण होणार ? हा प्रश्न राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना विचारला असता “मला असे वाटते कि गिरीश महाजनांना मुख्यमंत्री पद द्यावे”, असे विधान त्यांनी एच.डब्ल्यू.मराठीशी बोलताना केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आज (४ नोव्हेंबर) मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेनंतर एच.डब्ल्यू.मराठीने जितेंद्र आव्हाड यांच्याशी बातचीत केली. यावेळी मुख्यमंत्री पदावरून राज्यात सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना “गिरीश महाजनांना मुख्यमंत्री बनवावे”, असे विधान आव्हाड यांनी केले.
राज्यातील सत्तास्थापनेसंदर्भात महायुतीचे दोन्ही मोठे पक्ष असलेल्या भाजप-शिवसेनेत सध्या सुरु असलेला संघर्ष आणि शिवसेना-राष्ट्रवादीच्या नव्या समीकरणाबाबत राजकीय वर्तुळात सुरु असलेली चर्चा याबाबत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना प्रश्न विचारला असता “अशा चर्चा कुठे चालू आहेत ते मला तुम्हीच सांगा. मग मी तुम्हाला सांगतो”, असे म्हणत या प्रश्नाचे उत्तर देणे टाळले आहे. मात्र, थोड्याच वेळापूर्वी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी “शिवसेनेने जर भूमिका घेतली तर महाराष्ट्रामध्ये नवी समीकरणे निर्माण होऊ शकतात” असे स्पष्ट वक्तव्य माध्यमांशी बोलताना केले आहे.
“कोणाच्याही व्यक्तिगत आयुष्यात डोकावण्याचे सरकारचे काम नाही. मानवी अधिकारांमध्ये ‘राईट टू प्रायव्हसी’ नावाचा प्रकार असतो. आपल्या संविधानाचा देखील तो भाग आहे. त्यामुळे, सरकारकडून देशाच्या संविधानाला पायदळी तुडविण्याचा हा प्रयत्न होत आहे”, असा आरोप देखील जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. इस्राइली स्पायवेअर, पेगॅससचा उपयोग करून एनएसओ ग्रुपने भारतातील अभ्यासक, दलित कार्यकर्ते, वकील आणि पत्रकारांचे फोन हॅक करून त्यांच्यावर हेरगिरी करत असून सरकार लोकांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला घालत असल्याचा आरोप आज राष्ट्रवादीने पत्रकार परिषद घेऊन केला.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.