मुंबई | मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयित आरोपी कर्नल प्रसाद पुरोहित यांना न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. हे प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने न्यायालयाने सुनावणी रोखण्यास नकार दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने २१ नोव्हेंबरला पुढील सुनावणी होणार असल्यामुळे आम्ही दखल देणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालय म्हटले आहे. या पुरोहित यांनी याचिकेत म्हटले की, माझ्या विरोधात कोणत्याही वैध परवानगीशिवाय खटला चालवला जात असल्याबद्दल पुरोहितने म्हणाले आहे.
Supreme Court asks Bombay High Court to hear on November 21, Lt Col Prasad Shrikant Purohit's plea challenging the validity of the prosecution sanction for his trial under the Unlawful Activities Prevention Act (UAPA).
— ANI (@ANI) November 19, 2018
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल पुरोहित प्रसाद, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, अजय रहीरकर, सुधाकर द्विवेदी आणि सुधाकर चर्तुवेदी यांच्यासह सर्व ७ जणांवर दहशतवादी कृत्य करणे, हत्या आणि अन्य गुन्ह्यांखाली आरोप निश्चित केले आहेत. त्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) विशेष न्यायालयाने त्यांच्याविरोधात खटला सुरू केला आहे.
याआधी एनआयएच्या विशेष न्यायालयाने पुरोहित याची आरोप निश्चितीस स्थगिती देणारी याचिका फेटाळून लावली होती. तसेच ३० ऑक्टोबर रोजी उच्च न्यायालयानेही आरोपी पुरोहित आणि अन्य व्यक्तींविरोधात आरोप निश्चितीस स्थगिती देण्यास नकार दिला होता. त्यावर सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. यावर मुंबई उच्च न्यायालयास सुनावणी घेण्याचे निर्देश दिले आहेत. नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये २९ सप्टेंबर २००८ रोजी झालेल्या बॉम्बस्फोटात सहा जण ठार तर सुमारे शंभर जण जखमी झाले होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.