HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींच्या गैरहजेरीबाबत न्यायालयाची तीव्र नाराजी

नवी दिल्ली | विशेष एनआयए न्यायालयाकडून मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींना आठवड्यातून किमान एकदा न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, कर्नल पुरोहित यांच्यासह अन्य काही जणांचा समावेश आहे. या प्रकरणातील अनेक आरोपी हे जामिनावर असून न्यायालयीन सुनावणीदरम्यान अनेकदा ते गैरहजर असतात. याबाबत, आता न्यायालयाकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींची न्यायालयातील सुनावणीदरम्यान असलेली गैरहजेरी लक्षात घेता आता न्यायालयाने हे आदेश दिले आहे. न्यायालयाकडून या प्रकरणातील आरोपींना आठवड्यातून किमान एकदा न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणातील आरोपींना सुनावणीदरम्यान न्यायालयात उपस्थित राहणे अनिवार्य असणार आहे.

Related posts

लोकसभा निवडणुका लढविण्यास मनसे इच्छुक नाही ?

News Desk

नरक चतुर्दशीच्या मुहूर्तावर राज ठाकरेंनी घेतला भाजप सरकारचा समाचार

Gauri Tilekar

जेडीएसच्या आमदारांना भाजपकडून १०० कोटीची ऑफर | कुमारस्वामी 

News Desk