HW News Marathi
देश / विदेश राजकारण

मल्लिकार्जुन खर्गेंनी स्वीकारला काँग्रेस अध्यक्षपदाचा पदभार

Mallikarjun Kharge

मुंबई:- काँग्रेस पक्षाचे नवे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंनी (Mallikarjun Kharge) आज आपल्या अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला आहे. काँग्रेस मुख्यालयात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.

तब्बल दोन दशकानंतर पहिल्यांदाच गांधी कुटुंबाबाहेरील काँग्रेसला अध्यक्ष मिळाला आहे. काँग्रेसच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार मल्लिकार्जुन खरगे विरुद्ध काँग्रेसचे लोकसभेचे खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) यांच्यात थेट सामना रंगला होता. काँग्रेस अध्यक्ष पदासाठी सोमवारी (17 ऑक्टोबर) मतदान पार पडले होते. तर १९ ऑक्टोबरला याचे निकाल जाहीर झाले होते. या निवडणुकीत मल्लिकार्जुन खरगे हे 7 हजार 897 मताने विजयी झाले होते. तर काँग्रेसचे लोकसभेचे खासदार शशी थरूर यांना 1 हजार 72 मते मिळाली होती. काँग्रेस पदाच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत 416 मते बाद झाली होती. देशभरातून काँग्रेसच्या अध्यक्ष पदासाठी 9 हजार 385 एकूण मतदान झाल होते.

ठळक बातम्या:- झोमॅटोवर मिठाई खरेदी करणं पडल महागात; २ लाख ४० हजार ३१० रुपयांची ऑनलाईन फसवणूकीचा प्रकार समोर

राहुल गांधी यांच्या नेतृतवाखाली सध्या देशात काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरू आहे. तर या यात्रेच्या तीन दिवसांच्या दिवाळी ब्रेकमध्ये ४८ दिवसांनंतर प्रथमच दिल्लीत आलेले काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली. आज काँग्रेस अध्यक्षपदाच्या सूत्रं स्वीकारण्यापूर्वी खर्गे यांनी राजघाट इथं महात्मा गांधी, शांती वन इथं जवाहरलाल नेहरू आणि शक्तीस्थळ इथं इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांना वीरभूमी इथं जाऊन आदरांजली वाहिली. तर दुसरी कडे पक्षाचे माझी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्षाचे नवे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचं अभिनंदन केलं. सर्वात समाधानी बाब म्हणजे, अध्यक्षपदी निवडून आलेले हे अनुभवी नेते आहेत. एक साधा कार्यकर्ता म्हणून काम करत त्यांनी आपल्या मेहनतीनं आणि पक्षासाठी झोकून देऊन ही उंची गाठलीय, असं सोनिया गांधी म्हणाल्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘खायला नाही दाणा अन् मला बाजीराव म्हणा’, सेनेने पाकिस्तानला सुनावले!

News Desk

संजय राऊतांना जामीन मंजूर झाल्यानंतर सुषमा अंधारेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

Aprna

कर्नल पुरोहितला सशर्त जामीन

News Desk