HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

पश्चिम बंगाल सरकारने पंतप्रधान मोदींच्या सभेला परवानगी नाकारली

नवी दिल्ली । पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ३ एप्रिल रोजी होणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या रॅलीला परवानगी नाकारली आहे. पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यातील कावाखाली मैदानावर 3 एप्रिल रोजी पंतप्रधान मोदींची सभा आयोजित करण्यात आली होती. दरम्यान, पश्चिम बंगाल सरकारने ही परवानगी नाकारली असल्याचे सांगत भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. लोकशाहीत कोणीही आम्हाला रॅली घेण्यापासून रोखू शकत नाही, असे घोष म्हणाले.

आम्ही कावाखाली मैदानासाठी एका आठवड्यापूर्वीच अर्ज दिला होता. परंतु, तरीही आम्हाला सभेसाठी परवानगी नाकारण्यात आली. आम्हाला सिलीगुढीतील २ रेल्वे मैदानाची परवानगी मिळाली होती. म्हणूनच आम्ही रेल्वे मैदान निवडले. मात्र, भाजपच्या बाबतीत पश्चिम बंगाल सरकारची भूमिका पक्षपाती आहे, असा आरोप घोष यांनी केला आहे. यापूर्वीही आम्हाला पंतप्रधान मोदी आणि पक्ष अध्यक्ष अमित शहा यांच्या सभेदरम्यान असाच अनुभव आला होता, असेही घोष यांनी पंत्रकारांशी बोलताना सांगितले.

Related posts

पश्चिम बंगाल सरकारने हेलिकॉप्टरला परवानगी नाकारल्याने राहुल गांधींची सभा रद्द

News Desk

राजदंड पळविण्याच्या प्रयत्न, विधानसभेचे कामकाज पुन्हा तहकूब

News Desk

५० वर्षे सत्ता टिकविण्याचा संकल्प करा |अमित शहा

News Desk