HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

ममता या पश्चिम बंगालची संस्कृती, लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत !

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. “पश्चिम बंगालच्या लोकांना तृणमूल काँग्रेसच्या गुंडांच्या ताब्यात देऊन ममता यांनी लोकांचा अपेक्षा भंग केला आहे. ममता यांनी आपल्या राजकीय फायद्यासाठी घुसखोरांना वाचवून आपल्या मातीसोबत विश्वासघात केला आहे”, असा आरोप पंतप्रधान मोदी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर केला आहे. रविवारी (७ मार्च) कूचबिहारमध्ये झालेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. ममता या पश्चिम बंगालची संस्कृती, लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत, असा गंभीर आरोपही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केला आहे.

“ममता या आता प्रचंड अस्वस्थ झाल्या आहेत. त्यांची झोप उडाली आहे. स्पीड ब्रेकर दीदींनी राज्याच्या विकासाला ब्रेक लावला”, असा आरोपही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केला आहे. “ममता दीदींना धडा शिकवण्यासाठीच लोकसभा निवडणुका आल्या आहेत. तुम्ही आम्हाला केंद्रात सत्ता दिलीत तर दीदींना झुकण्यावाचून पर्यायच उरणार नाही. त्यांना विकासकामे करावीच लागतील. त्या कोणत्याही प्रकारे आपली मनमानी करू शकणार नाहीत, हे त्यांच्या लक्षात आले आहे”, असेही मोदी यांनी यावेळी म्हटले आहे.

Related posts

मी कधीही गरिबांचे पैसे लुटण्याचे पाप केले नाही !

News Desk

सवर्ण आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकण्यावर शंका | शरद पवार

News Desk

नाना पटोले यांचा पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश

News Desk