HW Marathi
राजकारण

…तर मग वाजपेयींनी महाभेसळीचे नेतृत्त्व केले काय ?

नवी दिल्ली | छत्तीसगढ दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांच्या महाआघाडीला महाभेसळ असे संबोधले होते. लोकांनी विरोधकांच्या महाभेसळीपासून सावध राहावे, असे मोदी म्हणाले होते. आता मोदींच्या या वक्तव्याला काँग्रेसकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. “विरोधकांची महाआघाडी जर महाभेसळ असेल तर मग महाआघाडीचे नेतृत्त्व करुन सरकार स्थापन करणाऱ्या माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी महाभेसळीचे नेतृत्त्व केले असे म्हणायचे का ?”, असा प्रश्न काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी उपस्थित केला आहे.

“१९९६, १९९८ आणि १९९९ साली महाआघाडीच्या सरकारचे नेतृत्त्व करणारे अटल बिहारी वाजपेयी यांनी महाभेसळीचे नेतृत्त्व केले होते का ? देशात आघाडी सरकारची प्रक्रिया कोणी सुरू केली ? व्ही. पी. सिंग यांना पाठिंबा कोणी दिला ? १९९६ साली १३ दिवसांचे सरकार कोणाच्या समर्थनामुळे स्थापन झाले ? मोदींच्या मते महाआघाडी महाभेसळ असेल तर मग एनडीएमध्ये इतर पक्ष नाहीत का ? मोदी एनडीएतील ४०-४२ पक्ष पक्षांचे नेतृत्त्व करतात. याप्रमाणे तर मोदीच महाभेसळीचे म्होरके ठरतात”, अशी टीका मनीष तिवारी यांनी केली आहे.

Related posts

भारताला जगामध्ये ना मर्द म्हटले जाईल | संजय राऊत

अपर्णा गोतपागर

भाजप सरकारला खडयासारखे बाजूला केल्याशिवाय गप्प बसायचे नाही !

News Desk

मी शेवटच्या श्वासापर्यंत शरद पवारांसोबतच राहणार !

News Desk