HW News Marathi
राजकारण

“स्वत: चे महत्व वाढवून घ्यायचे, काही लोकांना सवय असते”, उपमुख्यमंत्र्यांचा ठाकरेंना टोमणा

मुंबई | “स्वत: चे महत्व वाढवून घ्यायचे. काही लोकांना सवय असते”, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी  माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना लगावला आहे. हिवाळी अधिवेशन संपन्न झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी (30 डिसेंबर) संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी अधिवेशनात किती वेधयक मांडले आणि कोणते मंजूर झाले, याची माहिती दिली. त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र सोडले.

एका 32 वर्षाच्या युवकाला हे सरकार घाबरले का?, असा सवाल पत्रकारांनी विचाल्यावर उपमुख्यमंत्री म्हणाले, “मुख्यमंत्री म्हणाले छे…, यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी माईक घेत म्हणाले, मला असे वाटते की, स्वत: चे महत्व वाढवून घ्यायचे. काही लोकांना सवय असते, आम्हाला त्यांच्याकडे लक्ष द्याईला देखील वेळ नाहीय. आमच्या नागपूरमध्ये एक म्हण आहे. नखून कटाके शहीद बन ना, अशा प्रकारचा हा विषय आहे. कोण घाबरतेय कोणाला घाबरतय. आम्ही त्यांच्या पुष्य पिताश्रींच घाबरलो नाही. तर त्यांना घाबरण्याचा काय विषय आहे. त्यांच्या नाका खालून 50 लोके निघून आले. ते काहीच करू शकले नाही. त्यावेळीस सांगत होते. मुंबई पेटणार, मुंबईला आग लागणार, आग सोडा माचीसची काडी पण नाही जळली. कारण लोकांना हे पटले होते. यांनी हिंदुत्व सोडले, लोकांचे विचार सोडलेत. शिंदेसाहेब करत आहेत, ते बरोबर आहेत. त्यामुळे सर्व लोक आमच्या पाठिशी उभे राहिलेत.”

लवंगी आणि सुतळी बॉम्ब पण फुटला नाही

मुख्यमंत्री म्हणाले, “आणि आज 23 वर्षावर आम्ही काही बोललो नाही. आम्ही बलकुल बोलत नाही, मुख्यमंत्र्यांनी असे म्हटल्यानंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला.” संजय राऊत म्हणाले होते की, नागपूरला येऊन बॉम्ब लावला, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर ते मुख्यमंत्री म्हणाले, “बॉम्ब, लवंगी नाही आणि सुतळी पण नाही फुटला.”राज्य सरकारने चौकश्या लावल्या यावर बोलताना म्हणाले, “कुठलेही कारवाई सुडबुद्धीने, आकसा पोटी, सत्तेचा दुपयोग आम्ही करणार नाही. जे सत्य असेल ते सत्य बाहेर येईल.”

 

Related posts

मला कुठेही पाठवा, मी जादू दाखवीन !

News Desk

“दिल्ली तुम्ही घ्या, गुजरात आम्हाला सोडा”, संजय राऊतांचा भाजप आणि ‘आप’वर गंभीर आरोप

Aprna

“शिवसेना प्रमुखांचे निधन झाल्यानंतर ‘नेते पदा’ला कुठलीही किंमत राहीली नाही”, रामदास कदम यांचा राजीनामा

Aprna