HW Marathi
राजकारण

मनोहर पर्रीकर अनंतात विलीन, अंत्ययात्रेला लाखोंचा जनसागर लोटला

पणजी | गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर अनंतात विलीन. पर्रीकर यांच्या मुलांने त्यांना मुखाग्नी दिली.  भावूक मनाने पर्रीकरांना अखेरचा निरोप दिला. पर्रीकर यांच्या पार्थिवावर मीरामार किनाऱ्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आला आहे. त्यांच्या अंत्ययात्रेला लाखोंचा जनसागर लोटला होता.  पर्रीकर यांनी रविवारी (१७ मार्च) संध्याकाळी ६.३० च्या सुमारास दोनापावला येथील निवासस्थानी अखेरचा श्‍वास घेतला.

गेल्या काही काळापासून स्वादुपिंडाशी संबंधित कर्करोगाशी झुंज देत होते. अमेरिकेतही अनेकदा त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. गेल्या महिन्यापासून पर्रीकर अत्यवस्थ होते. आज सकाळी पर्रीकरांचे पार्थिव भाजपच्या कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यानंतर दुपारी कला अकादमीमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, नितीन गडकरी, स्मृती इराणी यांनी अंत्यदर्शन घेतले. यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास पर्रीकरांची अंत्ययात्रा निघाली.

 

 

 

Related posts

किर्ती आझाद यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

News Desk

…मग शेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन का नाही ?

News Desk

#LokSabhaElections2019 : प्रकाश आंबेडकरांच्या जातीवादाविरुद्धच्या संघर्षाला काय अर्थ उरतो ?

News Desk