HW News Marathi
राजकारण

मनोहर पर्रीकर यांच्यावर आज संध्याकाळी पणजीमध्ये होणार अंत्यसंस्कार

नवी दिल्ली | गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी रविवारी (१७ मार्च) अखेरचा श्वास घेतला. देशातील एक अभ्यासू आणि कर्तव्यनिष्ठ नेता अशी मनोहर पर्रीकर यांची ओळख आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विट करत मनोहर पर्रीकर यांच्या निधनाचे वृत्त देत शोक व्यक्त केला. मनोहर पर्रीकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सोमवारी (१८ मार्च) सकाळी ११ वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक बोलाविण्यात आली आहे. भाजप प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, पर्रीकर यांचे पार्थिव सोमवारी सकाळी ९.३० ते १०.३० पर्यंत भाजपच्या मुख्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

भाजप मुख्यालयानंतर मनोहर पर्रीकर यांचे पार्थिव कला अकादमीमध्ये आणण्यात येईल. भाजप प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, सामान्य नागरिकांना सकाळी ११ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत कला अकादमीमध्ये पर्रीकर यांचे अंत्यदर्शन घेता येणार आहे. मनोहर पर्रीकर यांच्यावर आज संध्याकाळी पणजी येथे अंत्यसंस्कार केले जातील. गेले अनेक महिने पर्रीकर हे कर्करोगासारख्या आजाराला झुंज देत होते. पर्रिकर यांच्या निधनानंतर केंद्राने आज म्हणजेच १८ मार्चला राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीसह देशातील अन्य राज्यांच्या राजधानीत तसेच केंद्रशासित प्रदेशांमधील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपकडून निवडणूक आयोगासमोर लोकशाहीचे वस्त्रहरण !

News Desk

शिवसेना-भाजप युतीचा चर्चा अंतिम, लवकरच होणार घोषणा !

News Desk

नारायण राणेंना सर्वोच्च न्यायालयाचा दणका; मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश कायम

Aprna