HW News Marathi
राजकारण

“अजित पवारांनी कोणत्या पुराव्यांच्या आधारे विधान केले, ‘ते’ सांगावे”, संभाजीराजेंचा सवाल

मुंबई | “अजित पवारांनी कोणत्या पुराव्यांच्या आधारे त्यांनी हे विधान केले आहे. हे अजित पवार यांनी सांगावे”, असा सवाल संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधानसभेत छत्रपती संभाजी महाराजासंदर्भात केलेल्या विधानाबद्दल केला आहे. अजित पवारांनी हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ‘छत्रपती संभाजी महाराजे धर्मवीर नव्हते तर स्वराज्य रक्षकच होते’, असे विधान विधानसभेत केले. अजित पवारांच्या संभाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्त्यवावरून संभाजीराजे छत्रपती यांनी आज (2 जानेवारी) पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर टीका केली.

 

संभाजीराजे छत्रपती म्हणाले, “संभाजी महाराज हे स्वराज्य वीर आहेत. स्वराज्याचे रक्षक आहेत. धर्माचे रक्षक आहेत. धर्मवीर आहेत. अजित पवारांनी कोणत्या पुराव्यांच्या आधारे त्यांनी हे विधान केले आहे. हे अजित पवार यांनी सांगावे. उलट माझी त्यांना सूचना ही राहिल, कुठलेही ऐतिहासिक संदर्भ आणि घटना बोलायची असेल, त्याचा अभ्यास पूर्ण केल्याशिवाय कोणतीही प्रतिक्रिया देऊ नये”, असा सल्ला संभाजीराजे छत्रपती दिली आहे.

 

संभाजीराजे छत्रपती म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले आहे. हिंदवी स्वराज्याला स्वरक्षण देण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, छत्रपती ताराणी यांनी केले यांच्याबद्दल काही दुमत नाही. आणि म्हणून छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य सरक्षक आहेत हे निश्चित आहेत. तसेच छत्रपती संभाजी मराहाजांनी धर्माचे सुद्धा रक्षण केले. हे कोणीही नकारू शकत नाही. म्हणून संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक तर आहेतच त्याच पाठोपाठ ते धर्मरक्षक सुद्धा आहेत. हे म्हटले तर काही चुकीचे होणार नाही. मी वेळोवेळी ऐतिहासिक कार्यक्रम असला, त्यावेळी माझे भाषण सुद्धा माझ्या भाषणाची सुरुवात शककते शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापन केली त्यांच्यापासून करतो. मी संभाजी महाराजांना स्वराज्य वीर, धर्मवीर, असे नेहमी संबोधले आहे. यापुढेही तसेच राहणार.”

 

अजित पवारांचे विधान साफ चुकीचे

म्हणून अजित पवारांनी जे विधान केले आहे. ते साफ चुकीचे आहे. ते अर्धसत्य बोलले आहे. त्यांनी स्वराज्यरक्षक बोलले ते बरोबर आहे. धर्मरक्षक आणि धर्मवीर नव्हते हे साफ चुकीचे आहे. म्हणून माझी जी काय भूमिका होती स्वराज्य वीर, धर्मवीर, स्वराज्य सक्षक, धर्मरक्षक ही माझी भूमिका माडंत आहे.

 

 

 

Related posts

बजेट म्हणजे भ्रमाचा भोपळा; विरोधकांची घोषणांनी विधानभवनाचा परिसर दणाणला

Aprna

मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिवाळी निमित्ताने शिंदे सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Aprna

पंतप्रधान मोदी २ दिवसांच्या उत्तराखंड दौऱ्यावर

News Desk