HW News Marathi
राजकारण

ईशान्य मुंबईतून मनोज कोटक यांना भाजपकडून उमेदवारी, सोमय्यांना मोठा धक्का

मुंबई | बहुचर्चित अशी ईशान्य मुंबईची जागा अखेर मनोज कोटक यांना भाजपने दिली आहे. भाजपने आज (३ एप्रिल) उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे भाजपचे विद्यामान खासदार किरीट सोमय्या यांना तिकीट मिळणार की, नाही. या चर्चेला अखेर पूर्णविराम लागला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्यामुळे सोमय्या यांच्या निवडणुकीचा पत्ता कट झाला असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी किरीट सोमय्या यांचे उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी प्रयत्न सुरु होते. परंतु, उद्धव ठाकरेंकडून सोमय्या यांना भेटीसाठी वेळ देण्यास टाळाटाळ केली गेली.

मनोज कोटक यांनी ईशान्य मुंबई मतदारसंघातील भाजपच्या कारकर्त्यांची भेट देखील घेतली होती. तसेच पक्षाने कोटक यांना निवडणुकीसाठी सज्ज राहण्यास सांगितल्याची माहिती मिळाली होती. ईशान्य मुंबईतून युतीचे उमेदवार किरीट सोमय्या की मनोज कोटक याबाबतचा अंतिम निर्णय हा केंद्रीय संसदीय समितीकडून घेण्यात आला असून कोटक यांच्या नावा अखेर शिक्कमोर्तब झाला आहे.

विशेषतः शिवसैनिकांच्या रोषामुळे किरीट सोमय्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनी देखील यापूर्वी किरीट सोमय्या यांना थेट आव्हान दिले होते. “गरज पडलीच तर मी अपक्ष लढेन. पण मी १०० टक्के सोमय्यांविरोधात निवडणूक लढविणार,” असे सुनील राऊत यांनी स्पष्ट केले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मर्यादित वेळेनंतर फटाके फोडल्याने मुंबईत २ अज्ञात तरुणांवर गुन्हा दाखल

Gauri Tilekar

राजे करणार या पक्षाचे नेतृत्व ?

News Desk

हल्ले माझ्यावर नसून दिल्लीच्या जनतेवर, जनता याचा नक्की बदला घेणार !

News Desk