HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

लोकसभेच्या पराभवाने खचलेले अनेक काँग्रेस कार्यकर्ते, नेते माझ्या संपर्कात !

मुंबई | “लोकसभेतील दारुण पराभवानंतर काँग्रेस कार्यकर्ते पूर्णपणे खचून गेले आहेत. त्यांपैकी अनेक कार्यकर्ते, नेते माझ्या संपर्कात आहेत”, अशी माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांना दिली आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी अखेर मंगळवारी (४ मे) आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुंबईतील निवासस्थानी पार पडलेल्या काँग्रेसच्या नाराज आमदारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून आता लवकरच ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. “मी विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. तांत्रिकदृष्ट्या माझा राजीनामा अद्याप विधानसभा अध्यक्षांनी मंजूर केलेला नसला तरीही त्या पदावर राहण्यात आता मला रस नाही. त्या पदावर आता कोणाची निवड करायची, हा सर्वस्वी पक्षाचा निर्णय आहे”, असेही राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. यापूर्वी पुत्र सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर १९ मार्च रोजी राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या विरोधीपक्षनेतेपदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे सुपूर्द केला होता.

लोकसभेसाठी काँग्रेसकडून अहमदरनगर मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्याने राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांनी नाराज होऊन १२ मार्च रोजी भाजपमध्ये प्रवेश केला. सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या देखील राजीनाम्याच्या तसेच भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगू लागल्या. या पार्श्वभूमीवर १९ मार्च रोजी राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या विरोधीपक्षनेते पदाचा तर आज (४ मे) आमदारकीचा राजीनामा दिला.

Related posts

#LokSabhaElections2019 : काँग्रेसने ‘या’ अनुभवी उमेदवारांना दिली पुन्हा संधी

News Desk

योगी आदित्यनाथसह मायावती यांच्यावर प्रचारबंदी, निवडणूक आयोगाचा दणका

News Desk

पक्षाने संधी दिली आणि ते संधीसाधू ठरले !

News Desk