HW News Marathi
राजकारण

Live Update : खुशखबर ! मराठा समाजाला अखेर यश

मुंबई | मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत १६ टक्के आरक्षण देण्याची तरतूद विधेयकात करण्यात आली आहे. यामध्ये ओबीसी समाजाला कुठलाही धक्का न लावता एसईबीसी या विशेष प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्यात येणार आहे. मराठा आरक्षण विधेयकातील महत्त्वाचे मुद्दे विश्वसनीय सूत्रांकडून मिळाले आहे. यामध्ये ५० टक्के मर्यादेबाहेर जाऊन मराठा समाजाला आरक्षण दिल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

कृती अहवाल (एटीआर) सादर केल्यानंतर विधानसभेतील सदस्यांनी अहवाल वाचनासाठी काही वेळ द्या, अशी विनंती केली. यानुसार दुपारी याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. चर्चेनंतर मराठा आरक्षणासंदर्भात विधेयक सादर केले जाणार आहे. कृती अहवालासोबत कायद्याची प्रतही देण्यात आली असून धनगर आरक्षणासंदर्भातही लवकरच पावले उचलली जातील, असे देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या सभागृहात सांगितले.

Live Update

  • धनगर आरक्षणासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे – सीएम
  • धनगर समाजाचे आरक्षण लवकरच मार्गी लावू मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
  • विधानपरिषदेत ही मराठा आरक्षणाचे विधेयक चर्चेविना मंजूर
  • विधानपरिषदेच्या सभागृहात जय भवानी, जय शिवाजीचा गजर
  • विधानपरिषदेत देखील काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून पाठिंबा
  • आरक्षण विधेयकाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनुमोदन
  • विधानपरिषेदत मुख्यमंत्र्यांकडून मराठा आरक्षण विधेयक सादर
  • विधानपरिषदेत मराठा आक्षरणाचे विधेयक मांडण्यास सुरुवात
  • मराठा आरक्षण विधेयक विधानपरिषधेत मांडले जाणार
  • मुख्यमंत्र्यांनी सभागृहाचे आभार मानले आहे
  • एकमताने मराठा आरक्षण विधेयक मंजूर
  • मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण
  • विधेयकाला विरोधकांचा एकमताने पाठिंबा
  • मुख्यमंत्र्यांनी मानले विरोधकांचे आभार
  • काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून मराठा आरक्षणाला पाठिंबा
  • सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांना सुरुवात
  • मुख्यमंत्र्यांच्या निवेदनाला सुरुवात
  • कुठल्याही चर्चेविना मराठा आरक्षण मंजूर होणार
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून सभागृहाच्या दिशेने रवाना
  • युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे विधानभवनात दाखल
  • विधानभवनाच्या परिसरात सेना-भाजपकडून जोरदार जल्लोष
  • फेटे बांधून आणि मिठाई वाटून मराठा आरक्षणाचा जल्लोष

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संविधानाला कोणताही धोका नाही- आठवले

News Desk

अकोल्याच्या जागेवरून युतीत तणाव निर्माण होणार ?

News Desk

मुंबईत शिवसेनेला जोरदार झटका शिवसेनेचे वाघ मनसे मध्ये

News Desk