HW News Marathi
राजकारण

‘पार्थ पवारांना मत द्या’ सांगत पैसे वाटणारे शेकाप कार्यकर्ते ताब्यात

मावळ | मावळ लोकसभेचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारादरम्यान सलग दुसऱ्या दिवशी शेकापच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटताना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडे पार्थ पवार यांची स्लिप देखील आढळून आली आहे. पनवेल निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने शेकापच्या कार्यकर्त्यांना लोकांना प्रत्येकी २००-२०० रुपये वाटताना ताब्यात घेतले आहे. पनवेल भरारी पथकाने २०० रुपयांची एकूण २९ पाकिटे जप्त केली आहेत. प्रताप आरेकर असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

शनिवारी (२७ एप्रिल) या प्ररकरणी पार्थ पवार यांचा प्रचार करत लोकांना पैसे वाटणाऱ्या २ जणांना कामोठे पोलिसांनी अटक केली होती. लोकांना पार्थ पवार यांची मतदान स्लिप, मतदार यादी आणि पैसे वाटताना या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतली. संदीप रामकृष्ण पराडकर, वैभव विठोबा पाटील अशी या आरोपींची नावे आहेत. यावेळी पोलिसांनी शेकाप कार्यकर्त्यांजवळून ११ हजार ९०० रुपयांची रोकड जप्त केली होती. याप्रकरणी पनवेलच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धनंजयराव राष्ट्रवादीत जाण्यासाठी किती पैसे घेतले…

News Desk

बेस्टच्या संपावर उच्च न्यायालय आज दुपारनंतर देणार निर्णय

News Desk

अहमदनगर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष करण ससाणे यांचा राजीनामा

News Desk