HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

मायावती एका उमेदवारीसाठी १५ कोटी रुपये घेतात, हा त्यांचा उद्योगच !

नवी दिल्ली | केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांनी बसप अध्यक्ष मायावती यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “बसपमध्ये कोणालाही फुकट उमेदवारी मिळत नाही. मायावती या पैसे घेऊन लोकांना उमेदवारी देतात हे सर्वांनाच माहीत आहे. मायावती एका उमेदवारीसाठी १५ कोटी रुपये घेतात. हा त्यांचा उद्योगच आहे”, असा आरोप मनेका गांधी यांनी केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत मेनका गांधी सुलतानपूरमधून निवडणूक लढत आहेत. सुलतानपूरच्या प्रचारसभेत मेनका गांधी बोलत होत्या.

“मायावती उमेदवारी विकतात ते सर्वच जण जाणतात. त्यांच्या पक्षाचे नेते तर ही गोष्ट मोठ्या अभिमानाने सांगतात. मायावती या उमेदवारी हिऱ्यांच्या किंवा रोख पैशांच्या स्वरूपात देतात. त्या एका उमेदवारीसाठी १५ कोटी रुपये घेतात, असे त्यांचे समर्थक सांगतात”, असे मनेका गांधी यांनी म्हटले आहेत. गरिबीबाबत बोलणाऱ्या मायावतींची अशी ‘माया’ असल्याचा टोला देखील मनेका गांधी यांनी लगावला आहे. मेनका यांचे पुत्र वरुण हे सुलतानपूरचे विद्यमान खासदार आहेत. वरुण हे आगामी निवडणुकीत पिलिभीत मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. २०१४ साली मनेका गांधी पिलिभीत मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या.

Related posts

तेलंगणामध्ये काँग्रेसचा सुपडा साफ

News Desk

उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्र्यांची कथित ऑडिओ क्लिप जाहीर सभेत सादर

News Desk

निवडणूक आयोगाने अमित शहांच्या इशाऱ्यावर प्रचारबंदी लागू केली !

News Desk