HW News Marathi
राजकारण

अमोल कोल्हेंकडून उदयनराजेंची मनधरणी सुरू, बंद दाराआड चर्चा

सातारा | राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले येत्या ५ सप्टेंबरला भाजप प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे. उदयनराजेंचा भाजप प्रवेश हा राष्ट्रवादी काँग्रेससाठी खूप मोठा धक्का मानला जोता. या पार्श्वभूमीवर उदयनराजे भोसले यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंनी भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान उदयनराजे भोसले आणि अमोल कोल्हेंची बंद दाराआड चर्चा सुरू आहे. अमोल कोल्हेंकडून उदयनराजेंची मनधरणी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

उदयनराजे भोसले यांच्या घरी आज (२ सप्टेंबर) गणरायाचे आगमन असून यानंतर काही वेळाने राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी उदयनराजेंच्या घरी हजेरी लावली. या दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा होते आहे. परंतु, या चर्चेत नेमके काय घडले ते समजू शकलेले नाही. गेल्या अनेक दिवसांपासून उदयनराजे यांनी राष्ट्रवादी सोडू नये, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आग्रही आहेत. त्यामुळे पवार यांचा निरोप घेऊन अमोल कोल्हे आणि प्रवीण गायकवाड यांनी त्यांची भेट घेतली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नारायण राणेंची खासदारकी काढून घेण्याची मागणी

News Desk

पंतप्रधान नरेंद्र मोदींची वर्ध्यात पहिली प्रचार सभा

News Desk

स्मारकांसाठी खर्च केलेले जनतेचे पैसे परत करा, मायावतींना न्यायालयाचा धक्का

News Desk