HW News Marathi
राजकारण

राज्यपालांची भेट घेत भाजप-सेनेकडून एकमेकांवरच दबाव टाकण्याचा प्रयत्न

मुंबई | नुकताच राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून राज्यातील सत्तास्थापनेविषयी अनेक उलट-सुलट चर्चांना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर आता भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष एकमेकांवर दबाव टाकण्याच्या प्रयत्नात असल्याचे पाहायला मिळत आहे. आज (२८ ऑक्टोबर) एकीकडे शिवसेना ज्येष्ठ दिवाकर रावते तर दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आहे. नुकत्याच झालेल्या शिवसेनेच्या बैठकीनंतर सत्तेत समसमान वाटा, मुख्यमंत्रीपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला याबाबत शिवसेना आग्रही असल्याचे पाहायला मिळाले. त्याचप्रामणे, युतीबाबत जो निर्णय घेतला जाईल तो भाजपने लिखित स्वरूपात द्यावा अशीही शिवसेनेची मागणी आहे. त्यातच, सेना-भाजपच्या नेत्यांनी राज्यपालांची स्वतंत्र जाऊन घेतलेली भेट यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

“युतीबाबत जे ठरले होते ते जर प्रत्यक्षात येणार नसेल तर माझ्यापुढे अन्य पर्याय खुले आहेत. पण, मला हे पाप करायचे नाही”, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित जागा न मिळाल्याने निकाल जाहीर झाल्यानंतर आता राज्यात शिवसेना मोठी आणि महत्त्वाची भूमिका बजावू शकेल अशी स्थिती निर्माण झाली आहे. काँग्रेसला-राष्ट्रवादीला मिळाला जनतेचा सन्मानजनक कौल पाहता राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी अशी समीकरणे दिसू शकतात अशी चर्चा होत आहे. याच पार्श्वभूमीवर एकीकडे राज्याच्या मुख्यमंत्री महायुतीचाच होणार असा दावा भाजपकडून केला जात आहे. तर दुसरीकडे हे दोन्ही पक्ष एकमेकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे.

विजयी आमदारांसोबतच्या बैठकीत उद्धव ठाकरे काय म्हणाले ?

  • लोकसभेवेळीच अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांसोबत यांच्यासोबत झालेल्या चर्चेत शिवसेना-भाजपचा ५०/५० चा फाॅर्म्युला ठरला होता. त्यानुसार, अडीच वर्षे भाजपला तर अडीच वर्ष शिवसेनेला मुख्यमंत्री आणि सर्व मंत्रीपदे मिळतील.
  • लोकसभेवेळी युतीबाबत जे काही ठरले होते ते भाजपच्या वरिष्ठांकडून लिखित स्वरूपात येणे अपेक्षित आहे.
  • मला जे काही ठरले होते त्यापेक्षा जराही जास्त काहीही नको.
  • युतीबाबत जे ठरले होते ते जर प्रत्यक्षात येणार नसेल तर माझ्यापुढे अन्य पर्याय खुले आहेत. पण, मला हे पाप करायचे नाही.
  • शिवसेना-भाजपची युती हिंदुत्वाच्या मुद्द्यावर अभेद्य आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आदित्य ठाकरेंनी मुंबईतील वायू प्रदूषणासंदर्भात केंद्रीय मंत्र्यांना लिहिले पत्र; म्हणाले…

Aprna

औरंगाबादमध्ये शिवसेना नगरसेवकावर तरुणांकडून हल्ला

Gauri Tilekar

‘सत्यमेव जयते’वर ‘ठग्स ऑफ हिंदुस्थान’ने मात केली आहे काय?

News Desk