HW News Marathi
राजकारण

पंतप्रधान मोदींचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्धव ठाकरे मध्यरात्रीच वाराणसीत दाखल

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (२६ एप्रिल) वाराणसीतून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दुपारी १२ वाजता पंतप्रधान मोदी आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. दरम्यान, पंतप्रधान मोदींचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे वाराणसीत दाखल झाले आहे. गुरुवारी (२५ एप्रिल) उद्धव ठाकरे पुण्याहून वाराणसीकरिता रवाना झाले. मध्यरात्री ते वाराणसीत दाखल झाले. पंतप्रधान मोदी उमेदवारी अर्ज दाखल करत असताना ते उपस्थित असतील. दुपारी १ वाजता ते मुंबईसाठी रवाना होतील.

भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी देखील उद्धव ठाकरे गुजरातमध्ये गेले होते. अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांना गुजरातला येण्याचे दिलेले आमंत्रण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले होते. त्याचप्रमाणे आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी फोन करून उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान मोदींचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे. पंतप्रधान मोदींनी गुरुवारी (२५ एप्रिल) वाराणसीत मोठे शक्तिप्रदर्शन केले. यावेळी बनारस हिंदू विद्यापीठाजवळील पंडित मदनमोहन मालवीय यांच्या पुतळ्यापासून पंतप्रधान मोदींनी तब्बल ७ किलोमीटरचा भव्य रोड शो काढून मोठे शक्तिप्रदर्शन केले. या रोड शोनंतर पंतप्रधान मोदींनी भाजप अध्यक्ष अमित शाह, योगी आदित्यनाथ यांच्यासह गंगा आरती देखील केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्या मुंबई काँग्रेसच्या कार्यालयात तिकीट वाटपासंदर्भात दिग्गज नेत्यांची बैठक

News Desk

माझा आणि शरद पवार यांचा थेट कोणताही संबंध आलेला नाही | प्रकाश आंबेडकर

Gauri Tilekar

महाराष्ट्रात विविध ठिकाणी पावसाने थैमान घातल्यामुळे MNS ने उद्याचा मेळावा पुढे ढकलला

Aprna