HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

भाजपच्या मेळाव्यात मंत्री गिरिश महाजनांना धक्काबुक्की

जळगाव | अमळनेर येथे आज (१० एप्रिल) भाजप- शिवसेनेच्या मेळाव्यामध्ये जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना धक्काबुकी करण्यात आली आहे. तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील यांच्यातही यावेळी मोठी हाणामारी झाली. या मारहाणीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. व्यासपीठावरच जिल्हाध्यक्ष आणि आमदार हे एकमेकांमध्ये भिडल्याचे यात पाहायला मिळत आहे. भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या समर्थकांनी ही मारहाण केल्याचे सांगितले जात आहे. गिरिश महाजन आणि गुलाबराव पाटील त्यांच्यासमोरच हा संपूर्ण प्रकार घडला.

शिवसेना-युतीच्या मेळाव्यासाठी अमळनेर येथे येत असताना राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या वाहनांचा ताफा पाडळसरे धरण कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी रोखला आहे. बुधवारी संध्याकाळी ५.४५ च्या सुमारास अमळनेरच्या प्रवेशद्वाराजवळ हा संपूर्ण प्रकार घडला आहे. पाडळसरे धरण पूर्ण करण्यात यावे, अशी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची मागणी होती. महाजन यांच्या वाहनांचा ताफा अमळनेरात शिरताच तिथे हातात झेंडे घेऊन उभ्या असलेल्या पदाधिका-यांनी पुढे येऊन तो रोखला.

वाहने थांबताच गिरीश महाजन हे खाली उतरले आणि या समितीच्या पदाधिका-यांशी त्यांनी चर्चा केली. यानंतर त्यांच्या वाहनाचा ताफा मेळाव्याच्या ठिकाणी रवाना झाला. महाजन यांच्यासोबत जळगाव लोकसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार आमदार उन्मेष पाटील हे देखील होते. या मेळाव्यात हा प्रकार घडला.

Related posts

भाजप उमेदवारांची आज होणार घोषणा

News Desk

#LokSabhaElections2019 : प्रकाश आंबेडकरांच्या जातीवादाविरुद्धच्या संघर्षाला काय अर्थ उरतो ?

News Desk

मनोहर पर्रीकर अनंतात विलीन, अंत्ययात्रेला लाखोंचा जनसागर लोटला

News Desk