HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी

मुंबई | पक्षाविरुद्ध भूमिका घेतल्याने काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी याबाबतची घोषणा केली आहे. काँग्रेसकडून औरंगाबाद मतदारसंघातून आमदार सुभाष झांबड यांना उमेदवारी जाहीर झाल्याने अब्दुल सत्तार नाराज होते. त्यामुळे सत्तार यांनी अपक्ष उमेदवारी देखील अर्ज भरला होता. परंतु, ८ एप्रिल रोजी त्यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला.

अब्दुल सत्तार यांनी २३ मार्चला मुख्यमंत्री फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची देखील भेट घेतली होती. त्यामुळे सत्तार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होत्या. ३ एप्रिलला अब्दुल सत्तार भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्यासोबत सत्तार यांच्यात झालेल्या बैठकीमुळे देखील या चर्चांचे प्रमाण वाढले होते. दरम्यान, आता पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर अब्दुल सत्तार नेमकी काय भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

Related posts

मी राजीनामा देतो, साताऱ्यात पुन्हा निवडणूक घ्या !

News Desk

ठाकरे-पवारांच्या विमान प्रवासाची चर्चा

News Desk

आता २०१९ संपूर्ण परिवर्तनाचे वर्ष ठरेल काय, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल!

News Desk