HW News Marathi
राजकारण

गुवाहाटीसंदर्भात केलेल्या वक्तव्यावर रवी राणांची दिलगिरी; तर बच्चू कडू उद्या भूमिका मांडणार

मुंबई | माजी आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्यात काही दिवसांपासून गुवाहटीबाबतच्या वक्तव्यवरून वाद सुरू होता. या वादामुळे बच्चू कडू आणि रवी राणा हे दोघे एकमेकांवर उघडपणे टीका करत होती. या पार्श्वभूमीवर बच्चू कडू आणि रवी राणा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रविवारी रात्री भेट घेटतली. यानंतर दोघांमधील वादावर पडदा पडल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यानंतर रवी राणा यांनी आज (31 ऑक्टोबर) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर चर्चा झाली. यानंतर रवी राणा यांनी माध्यमांशी बोलताना केलेले वक्तव्य मागे घेतले.

रवी राणा म्हणाले, “मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी माझे मार्गदर्शन नेते आहेत. वर्षा बंगल्यावर अडीच तास मिनिंग पार पडली. यात बच्चू कडू यांच्या बरोबर झालेला वादवर होती. माझ्यामुळे वाद सुरू झाला असताना तोंडातून काही वाक्य निघाले असेल तर ते वक्तव्य मी मागे घेतो. आम्ही दोघेही एका सरकारसोबत आहेत. आमच्या वादापेक्षा महाराष्ट्राचा विकास महत्वाचा आहे. माझ्याकडून वादावर पडला पडला आहे. आणि माझ्या शब्दाबद्दल जर कोणी दुखावले असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतोय.”

रवी राणांनी आरोप मागे केल्यानंतर बच्चू कडू म्हणाले

रवी राणा यांनी त्यांचे वक्तव्य मागे घेतल्यानंतर बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बच्चू कडू म्हणाले, “मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केल्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानले आहे. तर आज सायंकाळी 6 वाजता कार्यकर्त्यांची बैठक बोलवली आहे. यानंतर उद्या अमरावतीला मी भूमिका जाहीर करणार आहे. मी काही अयोग्य केले, असे मला वाटत नाही.”

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

येत्या 10 दिवसात गुलाम नबी आझाद नवी पक्षाची घोषणा करणार

Darrell Miranda

अहमदनगरमध्ये महानगरपालिकेच्या मतदान केंद्राबाहेर लाठीचार्ज

News Desk

नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली इंधन दरवाढी विरोधात आंदोलन

swarit