मुंबई | मुंबई महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे मुंबईतील रस्त्यांवर स-हास खड्यांचे साम्राज्य पहायला मिळते. याच रस्त्यातील खड्ड्यांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पवित्रा घेतल्याचे पहायला मिळत आहे. पावसामुळे रस्त्याची ठिकठिकाणी चाळण झाल्याचे मुंबईत चित्र आहे. रस्त्यांच्या झालेल्या दुरवस्थेवरुन प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी राज्याच्या मंत्रालयासमोर असलेला रस्ता खोदून आंदोलन केले.
मध्यरात्री मंत्रालयासमोरील रस्ता खोदत मनसेने राज्य सरकारचा केला निषेध… #HWnewsnetwork #HWnewsmarath@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @RajThackeray @AUThackeray @ShivSena @SandeepDadarMNS pic.twitter.com/spIdJ4FqhW
— HW News Marathi (@hwmarathi) July 17, 2018
सोमवारी रात्री उशिरा मनसैनिकांनी हे आक्रमक आंदोलन केले. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण- डोंबिवलीमध्ये खड्ड्यांमुळे रस्त्यांची सध्या चाळण झाल्याचे पहायला मिळत आहे. रस्त्यांमधील खड्डे आणि त्यामुळे होणाऱ्या अपघातांविरोधात मनसे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. सर्वसामान्यांच्या त्रासाची जाणीव सत्ताधा-यांना व्हावी यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणी आठ जणांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.
यापूर्वी देखील मनसे सरचिटणीस संदिप देशपांडे यांनी रस्त्यांतील खड्ड्यांसंदर्भात आक्रमक होऊन अभियंत्याला खड्ड्यात उभे केले होते. त्यानंतर पुन्हा एकदा मनसे मुंबईच्या रस्त्याबाबत आक्रमक असल्याचे दिसून येत आहे.
#Maharashtra: MNS workers break road in front of Mantralaya in Mumbai to protest against potholes in the city, late last night. pic.twitter.com/qvx3jsx7Rm
— ANI (@ANI) July 17, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.