HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

नवीन वर्ष मोदी मुक्त भारताचे जाओ, काँग्रेसच्या सर्व योजानांचे नाव बदलून सरकार चालविले

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे सालाबाद प्रमाणे यंदाही गुढीपाडव्या निमित्ताने आज (६ एप्रिल) शिवाजी पार्कवर जाहीर सभा सुरू झाली आहेत. नवीन वर्ष मोदीमुक्त भारताचे जाओ’, अशी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तोफ डागली. काँग्रेसच्या सर्व योजनाचे नाव बदूलन मोदींनी सरकार चालविले होते. तसेच  मोदींच्या कामाचा सात बारा मांडण्यासाठी १० सभा घेणार घेणार असल्याचे राज ठाकरेंनी सांगितले. पुढे राज ठाकरे असे देखील म्हटले की, आघाडीने माझा वापर करावा इतका वेडा नाही.

भाजपचे ज्येष्ठ नेते लालाकृष्ण आडवाणी यांनी गुदरमलेल्या भाजपला चांगले दिवस आले. परंतु त्यांना पंतप्रधान होता आले नाही. इतिहासात महान कामे करणाऱ्यांची नावे योजनांना का नाहीत ?, जगभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींची फेकू म्हणून ओळख ?, काँग्रेस राजवटी सुरु केलेले आधार कार्ड, पेन कार्ड मोदी सरकार नावे ठेवत होती, मग तुम्ही आधार कार्ड रद्द का नाही केली ?, मोदी देशभरत मग कामे काय केली ?, असे अनेक सवाल राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणातून उपस्थित केले.

राज ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे

 • राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात एच.डब्ल्यू. न्यूज नेटवर्कच्या एका स्टोरीचा विशेषत्वाने उल्लेख केला आहे.
 • एच. डब्ल्यू.न्यूज नेटवर्कने पंतप्रधान मोदींच्या ‘५९ मिनिट्स लोन’ योजनेचा फोलपण उघड करणारी एक इन्व्हेस्टिगेटिव्ह स्टोरी केली होती. या इन्व्हेस्टिगेटिव्ह स्टोरीचा राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात विशेषत्वाने उल्लेख केला आहे.
 • डिजिटल इंडिया नुसता डंगोरा, देशातील पहिले नियोजित डिजिटल गाव जैसे थे, तसेच आहे.
 • मोजी आता जात, धर्म यावर भाषण देत फिरतात, विकास, नोटबंदी आणि जीएसटीबद्दल मीठाची गुळणी दिली जाते
 • मोदींनी गोहत्या, गोमांस यावर वर्षभर रान पेटविले.
 • मोदी देशभरत मग कामे काय केली ?, याबद्दल काही बोले जात नाही
 • मृत दहशतवाद्यांचे आकडे विचारणाऱ्याला भाजप देशद्रोही ठरवले जातेय
 • एअर स्ट्राईकमध्ये किती जण मारले गेले यांचे आकडे तुम्हाला कसे माहिती?
 • काँग्रेस राजवटी सुरु केलेले आधार कार्ड, पेन कार्ड मोदी सरकार नावे ठेवत होती, मग तुम्ही आधार कार्ड रद्द का नाही केली ?
 • सरकारी योजनांची नावे स्व:ताच्या पक्षांशी संबंधित लोकांची नावे कशी ?,असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केली
 • इतिहासात महान कामे करणाऱ्यांची नावे योजनांना का नाहीत ?
 • काँग्रेसच्या सर्व योजानाचे नाव बदलून मोदींनी कारभार केला
 • मोदींच्या कामाचा सात बारा मांडण्यासाठी सभा घेणार
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी मतांसाठी प्रत्येक गोष्टीचे भांडवल करतात.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्ते आल्यानंतर बद्दले, यानंतर माझे त्यांच्या बद्दलचे मतही बदले.
 • मोदी मीडियाचे कॅमेरे घेऊन आईला भेटायला जातात.
 • काँग्रेस विरोध पक्षात बसले की, काँग्रेसचे महत्त्व कळते
 • गुजरातमध्ये मी गेल्यानंतर माझ्याची सृस्ती सांगणारे नेहमी माझ्यासोबत असायचे
 • मोदींनी निव्वळ खोटे स्वप्न दाखवून सत्ता मिळवली
 • इतके बहुमत असताना ही मोदींनी  देशाची वाट का लावली
 • गेल्या पाच वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एकदाही पत्रकार परिषद घेतली नाही, मोदींना नेमकी कशाची भिती वाटते
 • भाजपचे ज्येष्ठ नेते लालाकृष्ण आडवाणी यांनी गुदरमलेल्या भाजपला चांगले दिवस आले. परंतु त्यांना पंतप्रधान होता आले नाही.
 • जगभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींची फेकू म्हणून ओळख ?, याचा विचार करा.
 • मी आघाडीचा प्रचार करण्याचा विधानसभेचा आणि याचा काही संबंध नाही
 • मोदी एफ-१६ विमान पाडल्याचे का सांगितले, राज ठाकरेंनी सवाल उपस्थित केला
 • शिवसेना-भाजपची युती झाली तरी अंतर्गत झोंबाझोंबी सुरूच
 • नरेंद्र मोदी आणि अमित शहा ही जे दोन संकट दूर करण्यासाठी लढणारआहे.जर कोणाचाही मग तो काँग्रेस-राष्ट्रवादी असो,  याचा कोणालाही फायदा होत असे तर मला काही फरक पडत नाही.
 • संकट दूर करण्यासाठी एखादे दुसरे बटण दाबले तर मग काय झाले.
 • राजा ठाकरेला राष्ट्रवादी-काँग्रेसवाले वापरुन घेतात, असे म्हटले जात होते. परंतु मी काय वेडा नाही
 • मतदानाचा तारखा लक्ष्यात घेऊन महाराष्ट्र दौर आखण्यात येणार आहे
 • येत्या काही दिवासांत महाराष्ट्रभर ८ ते १० सभा घेणार आहे
 • हे नवी वर्ष मोदी मुक्त भारताचे जाओ, असे बोलून राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदीवर टीका केली

 

Related posts

 नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी | कमल हसन

News Desk

राहुल गांधींनी देशाची माफी मागावी | दाणवे

News Desk

केवळ काल्पनिक धाडस दाखवून देशाची प्रगती साधता येत नाही !

News Desk