HW News Marathi
राजकारण

मनसेचे एकमेव आमदार शरद सोनावणे यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई | मनसेचे एकमेव आमदार शरद सोनावणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थिती सोनावणे यांनी आज (११ मार्च) हातावर शिवबंध बांधून पक्षात प्रवेश केला आहे. शिवसेना भवनात पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला आहे. शरद सोनावणे हे पूर्वी शिवसेनेत होते, मात्र २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना तिकीट नकारल्याने त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करतन राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला होता.

मी आम्हा सगळे स्वगृही परतलो आहोत. मी राज ठाकरे यांच्यावर नाराज नसून मला त्यांच्याकडून खूप प्रेम मिळाले आहे. परंतु घरची ओढ लागल्यामुळे मी स्वगृही परलो असल्याचे शरद सोनावणे यांनी सेनेत प्रवेश केल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले आहे.

मनसेच्या तिकीटावर ते पुणे जिल्ह्यातील जुन्नर विधानसभा मतदार संघातून निवडून आले होते. शरद सोनावणे हे एकमेव उमेदवार आहेत जे मनसेच्या तिकीटावर निवडून आले होते. गेल्या साडेचार वर्षात सोनावणे यांचा मनसेच्या कार्यक्रमात सक्रिय सहभाग नव्हता.

परंतु सोनावणे जर सनेत सामील होण्याची माहिती मिळताच जुन्नरमधील शिवसैनिकांनी त्यांना तीव्र विरोध केला होता. बाहेरच्या उमेदवार शिवसैनिक स्वीकारणार नसल्याची भूमिका जुन्नर तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतली होती. आमची भूमिका ऐकून न घेता शरद सोनावणे यांना उमेदवारी दिली तर तालुक्यातील सर्व पदाधिकारी आपापल्या पदाचा सामूहिक राजीनामा असा इशाराही दिल्याची चर्चा होत्या. परंतु आता जुन्नरमधील शिवसैनिक काय निर्णय घेणार सर्वाचे लक्ष लागेल आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोकसभेच्या निकालानंतर शिवसेनेच्या २३ विजयी खासदारांना काशीविश्वेश्वराला घेऊन जाणार !

News Desk

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे काही मतभेद आहेत ते सर्व संपवून टाकायचे! – अजित पवार

Aprna

टोपी घालून कोणी नेताजी होत नाही । शोभा डे

Gauri Tilekar