HW News Marathi
राजकारण

शिवतीर्थावर आज होणार मनसे ‘राज’गर्जना

मुंबई | गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांची शिवाजी पार्कवर सभा होणार आहे. या सभेत राज ठाकरे हे काय बोलणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. राज ठाकरे यांना ऐकण्यासाठी चांद्यापासून ते बांद्यापर्यंत लोक शिवाजी पार्कवर येणार आहेत. ही सभा विक्रमी होईल, अशी माहिती मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी दिली.

लोकसभा विधानसभा आणि नजीकच्या काळात झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये मनसेला सपाटून पराभवाला समोर जाव लागल आहे. त्यामुळे कार्यकर्त्यामध्ये मरगळ आल्याच चित्र बघायला मिळाल. मात्र मागील काही दिवसांपासून राज ठाकरे यांनी मोठे फेरबदल करत पक्षाला नवीन उभारी देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे गुडीपाडव्याच्या निमित्ताने राज ठाकरे हे कार्यकर्त्यांसमोर काय संकल्प आणि कार्यक्रम ठेवतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची प्रकरणावर 21 मार्चला होणार सुनावणी

Aprna

अमित शहांना स्वाईन फ्लू, उपचार सुरू

swarit

फेर मतदानातही ईव्हीएममध्ये बिघाड

News Desk