नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पक्षाची एक्सपायरी डेट, येत्या काही दिवसात संपणार आहे, अशा शब्दात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. मोदी सरकारच्या विरोधात आज (१९ जानेवारी) तृणमूल काँग्रेसने कोलकात्यात महारॅलीचे आयोजन केले. या महारॅलीला २२ पक्षांचे नेते उपस्थित होते.
West Bengal CM Mamata Banerjee at Opposition rally in Kolkata: Modi govt is past its expiry date and in the coming days, a new dawn will descend. We will work together and it's a promise. pic.twitter.com/ItO9bcpe0Q
— ANI (@ANI) January 19, 2019
तसेच लवकरच देशात एक नवी पहाट उगवली, असे वक्तव्य ममता बॅनर्जींनी महा व्यक्त केला. येणाऱ्या काळात विरोधकांनी एकजूट दाखवावी. जिथे जो पक्ष मजबूत असेल, तिथे इतर पक्षांनी त्याला साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. रथयात्रेच्या नावाखाली पश्चिम बंगालमध्ये दंगली होऊ देणार नाही, अशा शब्दात ममता यांनी भाजपला धमकी वजा इशारा दिला.
West Bengal Chief Minister Mamata Banerjee at Opposition rally in Kolkata: Danga laga do, fasaad laga do, ek hi unka (BJP) issue hai, Hum Bengal main 'Rath Yatra' ke naam pe danga-fasaad nahi karne denge. pic.twitter.com/FbqCWe8oLK
— ANI (@ANI) January 19, 2019
भाजप पश्चिम बंगालमध्ये यशस्वी होणार नाही. त्यांना फक्त भोपळाच असेल, असा टोला ममता यांनी भाजपला लगावला. मोदींनी देशातील सर्व संस्था उद्ध्वस्त केल्या आहेत. त्यांना वाटते फक्त तेच प्रामाणिक आहेत. मात्र येणाऱ्या दिवसात महाआघाडी त्यांच्यासमोर आव्हान उभे करेल, असे त्यांनी महारॅलीला संबोधित करताना म्हटले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.