HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

मोदी दर दोन-तीन दिवसांआड महाराष्ट्रात येत आहेत, राजकीय हवा बदलत आहे !

मुंबई | “मी अनेक निवडणुका पाहिल्या. पूर्वी देशाचा पंतप्रधान केवळ एक-दोन वेळा महाराष्ट्रात प्रचारासाठी येत होते. नरेंद्र मोदी मात्र दर दोन-तीन आहेत महाराष्ट्रात येत आहेत. यावरून लक्षात येत आहे कि राजकीय हवा बदलत आहे”, असे सूचक विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. “मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभेसाठी आपले उमेदवार उभे केलेले नाहीत. त्यामुळे विधानसभेला आम्ही त्यांच्याशी चर्चा करू शकतो”, असेही शरद पवार यावेळी म्हणाले. शरद पवार हे शनिवारी (१३ एप्रिल) पत्रकार परिषदेत बोलत होते.

शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे :

  • मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभेसाठी आपले उमेदवार उभे केलेले नाहीत. त्यामुळे विधानसभेला आम्ही त्यांच्याशी चर्चा करू शकते, असेही पवार यांनी सांगितले.
  • मोदी सरकारने आश्वासने न पाळल्याने जनतेमध्ये असंतोष
  • पंतप्रधान मोदींना व्यक्तीगत हल्ले करून कोणताही प्रतिसाद मिळत नाही. म्हणूनच त्यांनी काश्मीरमध्ये काँग्रेस फुटीरवाद्यांना पाठिंबा देत असल्याची टीका करायला सुरुवात केली
  • वंचित बहुजन आघाडीचा अजेंडा काय आहे, ते मला माहिती नाही. परंतु, काही मंडळींनी हेतुपूर्वक मतविभाजन करण्यासाठी हा प्रयत्न केला असू शकतो
  • भाजप सरकारने राफेल कराराच्या ३ वेगवेगळ्या किंमती सांगितल्या. विरोधकांनी संयुक्त संसदीय समितीतर्फे चौकशी करण्याची मागणी धरली. याबाबत दिवगंत मनोहर पर्रीकरांना माहिती होती. म्हणूनच त्यांनी आपले पद सोडले.

Related posts

शिवराजसिंह चौहान यांची दुतोंडी भूमिका ?

News Desk

सेना-भाजपने राजकारणासाठी बाबासाहेबांचे नाव वापरले

News Desk

शिवसेनेपेक्षा मनसे चांगली !

News Desk