नवी दिल्ली | ‘पंतप्रधान मोदींनी संयम बाळगून पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा राखावी. आपल्या वागणुकीतून त्यांनी सर्वांसमोर एक चांगले उदाहरण तयार करायला हवे. त्यांची वागणूक पंतप्रधानपदाच्या नैतिकतेला साजेशी असायला हवी’, असा खोचक सल्ला माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मोदींना दिला आहे. ते माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांच्या ‘फेबल्स ऑफ फ्रॅक्चर्ड टाइम्स’ पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमादरम्यान बोलत होते.
My advice to PM is that he should exercise due restraint becoming of the office of PM.When he goes to states which are ruled by parties other than his,I think,has an obligation not to use the type of language which has now become a common practice:Former PM Manmohan Singh (26.11) pic.twitter.com/Dn0hrCDWza
— ANI (@ANI) November 26, 2018
‘यूपीए सरकारच्या काळात भाजपची सत्ता असणाऱ्या राज्यांमध्ये मी कधीही भेदभाव केला नाही. मी पंतप्रधान असताना जेव्हा भाजपची सत्ता असणाऱ्या राज्यांचा दौरा करायचो तेव्हा माझे भाजपच्या नेत्यांसोबत चांगले संबंध होते. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान देखील ही गोष्ट मान्य करतील”, असेही मनमोहन सिंग यांनी यावेळी म्हटले. दरम्यान, सध्या निवडणुकांच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदींकडून विरोधकांवर टीका करताना टोकाची भाषा वापरली जात असून मनमोहन सिंग यांनी दिलेला हा सल्ला याच संदर्भाने असू शकतो, असे म्हटले जात आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.