May 24, 2019
HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

देशात मोदी-शाह जोडीचा प्रयोग फसला म्हणून मोदींनी पत्रकार परिषद घेतली !

मुंबई | “पंतप्रधान मोदींना लोकसभा निवडणुक निकालाच्या तोंडावर ५ वर्षानंतर पंतप्रधान मोदींना पत्रकार परिषद घ्यावी लागली. हा बदल कसा झाला ? देशात मोदी-शाह जोडीचा प्रयोग फसला आहे. पंतप्रधान मोदींना लोकांची नाराजी लक्षात आली आहे”, असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी लगावला आहे. ते सोलापूरमध्ये बोलत होते.

“राज्यातील दुष्काळ काँग्रेस उपसमिती अहवाल प्राप्त झाला असून राज्यातील दुष्काळस्थिती भीषण आहे. सरकारने दुष्काळाबाबत केवळ आश्वासने दिली आहेत. मात्र, अंमलबजावणी झाली नाही. सरकार सध्या त्यांचा व्हिडिओ कॉन्फरन्सचा खेळ सुरु केला आहे. दुष्काळग्रस्तांची मते घेतली, पण या गंभीर समस्येचे काय ?”, असा सवाल अशोक चव्हाण यांनी केला आहे.

Related posts

गडचिरोलीमधील एटापल्ली मतदान केंद्राजवळ आयडी स्फोट

News Desk

मोदी सरकारचा क्रांतिकारक निर्णय

News Desk

एनडीएच्या बैठकीला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार नाहीत ?

News Desk