HW News Marathi
राजकारण

मोदींच्या जाहीरसभेत भाजपच्या एका मंत्र्यांकडून महिला मंत्र्यांचा विनयभंग

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शनिवारी (९ फेब्रुवारी) त्रिपुरा येथे झालेल्या जाहीर सभेत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. या समारंभात मोदींच्या भाषणानंतर याच व्यासपीठावर भाजपच्या एका मंत्र्याने एका महिला मंत्र्याचा विनयभंग केल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. विरोधकांकडून भाजपच्या या मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. या प्रकरणी त्या महिलेने अद्याप कुठलीही तक्रार दाखल केलेली नाही. एका वृत्तवाहिनीने ही बातमी दिली आहे.

त्रिपुरातील राज्यमंत्री मनोज कांती देव असे या मंत्र्यांचे नाव असून यावेळी या मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री विप्लबकुमार देव आणि अन्य काही मंत्री हजर होते. त्यावेळी त्या मंचावर उपस्थित महिला मंत्र्याचा विनयभंग करण्यात आला. मोनोज देव यांच्या या कृत्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विरोधक करत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आदित्य ठाकरेंसह शिवसेनेच्या सर्व आमदारांनी घेतली राज्यपालांची भेट

News Desk

आज सज्जन कुमार, उद्या टाइटलर, त्यानंतर कमलनाथ तर सर्वात शेवटी गांधी परिवार !

News Desk

पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात अशी घटना घडणे हे धक्कादायक !

News Desk