नवी दिल्ली | महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, गुजरात आणि राजस्थानमध्ये गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पावसाने हैराण झाले आहेत. मुसळधार पावसामुळे देशभरात आतापर्यंत ३५ जणांना जीव गमावले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेमुळे दुःख व्यक्त केले आहे. परंतु मोदींनी मात्र गुजरातमधील पीडितांना करून मदत करण्याची घोषणा ट्वीट करून माहिती दिली केली.
PM @narendramodi approved an ex- gratia of Rs. 2 lakh each from the Prime Minister’s National Relief Fund for the next of kin of those who have lost their lives due to unseasonal rain and storms in various parts of Gujarat.
— PMO India (@PMOIndia) April 17, 2019
काँग्रेस ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी मोदींच्या ट्वीटवर टीका करत म्हटले की, “मोदीजी तुम्ही केवळ गुजरातचे नाही तर संपूर्ण देशाचे पंतप्रधान आहात.” देशभरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे ३५ हून अधिक लोक दगावले, शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे. महाराष्ट्रातही अनेक फळबागांचे नुकसान झाले आहे. परंतु नरेंद्र मोदींनी केवळ गुजरातलाचा मदत घोषित केली आहे. याबाबत पंतप्रधान कार्यालयाने ट्वीट करून म्हटले होते.
“गुजरातमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळामुळे जीव गमवावा लागलेल्या लोकांच्या कुटुंबियांना पंतप्रधान मदत निधीमधून प्रत्येकी २-२ लाख रुपये भरपाई म्हणून देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच जखमींना ५०-५० हजार रुपये भरपाई म्हणून देण्याची घोषणा केली.”
मोदी जी , आप देश के पीएम ना कि गुजरात के।
एमपी में भी बेमौसम बारिश व तूफ़ान के कारण आकाशीय बिजली गिरने से 10 से अधिक लोगों की मौत हुई है।लेकिन आपकी संवेदनाएँ सिर्फ़ गुजरात तक सीमित ?
भले यहाँ आपकी पार्टी की सरकार नहीं है लेकिन लोग यहाँ भी बस्ते है।— Kamal Nath (@OfficeOfKNath) April 17, 2019
त्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी ट्विटरद्वारे मोदींना प्रत्युत्तर दिले आहे. कमलनाथ यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, “मोदीजी तुम्ही केवळ गुजरातचे नव्हे तर संपूर्ण देशाचे पंतप्रधान आहात. मध्य प्रदेशात वादळ, मुसळधार पाऊस आणि वीजेमुळे १० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. परंतु तुमची संवेदना केवळ गुजरातसाठीच आहे. मध्यप्रदेशात तुमचे सरकार नाही, परंतु या राज्यातदेखील माणसेच राहतात.”
वादळीवाऱ्यात मृत्युमुखी पडलेली राज्य
गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे राजस्थान आणि गुजरात प्रत्येकी ९ जण मृत्युमुखी पडले आहेत, तर मध्य प्रदेशात पावसाने १५ जणांचा बळी घेतला आहे. तसेच दिल्लीत आणि बिहारमध्ये दोन्ही राज्यात एक दगावले आहेत. मध्य प्रदेश, राजस्थान आणि हिमाचल प्रदेशमध्ये हवामान खात्याने वादळाचा अलर्ट जारी केला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.