नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकार विरोधात पहिल्यांदाच लोकसभेत अग्निपरीक्षा होणार आहे. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सरकार विरोधात अविश्वासचा प्रस्ताव स्वीकारला आहे. मोदी सरकार देशातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यास अपयशी ठरल्याचा दावा करत टीडीपीने लोकसभेत अविश्वासचा प्रस्ताव मांडला आहे.
Lok Sabha Speaker Sumitra Mahajan accepts the No Confidence Motion moved by opposition parties, including Congress and TDP. #MonsoonSession pic.twitter.com/PNfO41QFOY
— ANI (@ANI) July 18, 2018
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात विरोधकांचा मोदी सरकार विरोधात गदारोळ पाहायला मिळाला आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन १० ऑगस्टपर्यंत सुरू राहणार असून यामध्ये एकूण १८ बैठका होणार आहेत. संसदेत सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न विरोधी पक्षांनी केला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.