नवी दिल्ली | कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींना टिकेचे लक्ष केले आहे. सिंगापूर येथील नानयांग तंत्रज्ञान विद्यापीठात पंतप्रधान मोदींची मुलाखत घेण्यात आली होती. ही मुलाखत पुर्णपणे स्क्रिप्टेड असल्याचा टोला राहुल गांधींनी लगावला आहे. राहुल यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हॅंडल वरुन ट्विट करत मोदींवर टिका केली आहे. १ जून रोजी सिंगापूर येथे पंतप्रान नरेंद्र मोदींची मुलाखत घेण्यात आली होती तेव्हा पंतप्रधान मोदींना उपस्थितांनी थेट प्रश्न विचारले होते.
The first Indian PM who takes “spontaneous” questions that the translator has pre-scripted answers to!
Good that he doesn’t take real questions. Would have been a real embarrassment to us all if he did. pic.twitter.com/8Iyfgiaseh
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 4, 2018
नरेंद्र मोदींच्या सिंगापूर दौऱ्यातील मुलाखतीवर राहुल गांधींनी निशाणा साधला आहे. ‘लोकांनी विचारलेल्या मुक्त प्रश्नांना उत्तरे देणारे पंतप्रधान मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान आहेत. विशेष म्हणजे मोदी काय उत्तरे देणार, हे त्यांच्या दुभाषकाला आधीच माहित होते,’ असा टोला राहुल यांनी मोदींना लगावला आहे. यापुढे बोलताना राहुल गांधी म्हणालेत, ‘बरे झाले, मोदींना खरेच लोकांनी थेट प्रश्न विचारल्या नंतर उत्तरे द्यावी लागली नाहीत, अन्यथा मोदींसमोर पेचप्रसंग निर्माण झाला असता,’ असेही राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. या ट्विट सोबत राहुल गांधीनी सिंगापूरमधील मोदींच्या मुलाखत कार्यक्रमाचा व्हिडीओ देखील जोडल्याचे पहायला मिळत आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.