HW News Marathi
राजकारण

देशभरात मोदींची त्सुनामी, पश्चिम बंगालमध्ये आम्हाला अभूतपूर्व विजय मिळेल !

नवी दिल्ली | “ममतांचे हे ध्रुवीकरणाचे राजकारण फार काळ चालणार नाही. पश्चिम बंगालमध्ये भाजपला अभूतपूर्व विजय मिळेल. सध्या देशभरात मोदींची त्सुनामी आहे”, असा दावा केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी केला आहे. त्याचप्रमाणे “उत्तर प्रदेशमध्ये भाजप ७४ जागा जिंकेल”, असाही दावा पीयूष गोयल यांनी केला आहे. “दिग्विजय सिंह यांनी ज्या पद्धतीने हिंदू समाजाला अपमानित केले ते आम्ही उघडकीस आणले आहे. दिग्विजय सिंह यांनी हिंदू दहशतवाद शब्द प्रचलित केला. म्हणूनच आम्ही साध्वी प्रज्ञा यांना उमेदवारी दिली आहे”, असे पियुष गोयल यावेळी म्हणाले.

भाजपकडून साध्वी प्रज्ञा यांना भोपाळमधून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे भोपाळमध्ये साध्वी प्रज्ञा विरुद्ध काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह असा सामना रंगणार आहे. “ममतांचे हे ध्रुवीकरणाचे राजकारण फार काळ चालणार नाही. आज देशभरात मोदींची त्सुनामी आहे. मोदी सरकारच्या काळात शेतकरी, महिला आणि प्रत्येक क्षेत्रात विकास झाला आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपला अभूतपूर्व विजय मिळेल. राजकीय हिंसेने निवडणूक जिंकता येत नाही”, असेही गोयल यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फुंडकरांच्या जाण्याने राजकीय वर्तुळात शोककळा

News Desk

आता न्यायालय देखील म्हणते ‘चौकीदार चोर है’ !

News Desk

…मग पाटीदारांना आरक्षण का नाही ?

News Desk