HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

“नारायण राणे यांची चार आण्याची पण लायकी नाही”, संजय राऊतांनी बोचरी टीका

मुंबई | “नारायण राणे यांची चाराण्याची पण लायकी नाही”, अशी बोचरी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मानहानीची कायदेशीर नोटीस बजावल्यासंदर्भात बोलताना केली. नारायण राणेंनी (Narayan Rane) सार्वजनिक मंचावरून माझ्यावर आणि शिवसेनेवर केलेले आरोप सिद्ध करावेत अन्यथा माफी मागावी, असे संजय राऊत यांनी त्यांच्या ट्वीटर हँडलवरून ट्वीट माहिती दिली आहे. यासंदर्भात संजय राऊत यांनी आज (3 फेब्रुवारी) माध्यमांशी बोलताना नारायराण राणेवर हल्लाबोल केला आहे.

 

नारायण राणे यांच्यावर मानहानीचा खटल्यासंदर्भादत संजय राऊत यांना पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, “मी हा खटला पैशासाठी दाखल केलेला नाही. जे इतर लोक करतात 100 कोटी. यांची चार आण्याची पण लायकी नाही. जस मी चंद्रकांत पाटालांवर सव्वा रुपयाचा खटला दाखल केला. मला काय पैसे नकोय. मी मध्यमवर्गीय माणूस आहे. आम्ही आमची आणि पक्षाची प्रतिष्ठा,  माझा पक्षप्रमुखांची प्रतिष्ठा, इज्जत, शिवसेना, यासाठी आम्ही कायदेशी लढाई लढू. आणि त्यांना कोर्टात खेचणार. त्यांनी कोर्टात उत्तर देऊ द्या. काय तुमच्याकडे पुरावे असतील ना. काय तुमच्याकडे पुरावे असतील ना, खोटेपणाचे ते तुम्ही कोर्टामध्ये द्या. आमचे नाणे खणखणीत आहेत. आम्ही सत्याची बाजू सातत्याने घेत आहोत. बाळासाहेब ठाकरेंचे आमच्यावर संस्कार आहेत. खोटे बोलयाचे नाही. आणि परत सांगतो, किती हास्यास्पद विधान आहे. मी खासदार केले, आहो, तुम्हालाचा बाळासाहेब ठाकरेंनी मुख्यमंत्री केले. तुम्हाला विरोधी पक्षनेते बाळासाहेब ठाकरेंनी केला. आम्हा सगळ्यांना प्रत्येक पद ही आधी बाळासाहेब ठाकरेंनी दिली. नंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिली. याचे भान आणि यांची जाणीव ही राखायला हवी.”

 

संजय राऊतांनी ट्वीटमध्ये नेमके काय म्हणाले

संजय राऊतांनी ट्वीटमध्ये म्हणाले, “नारायण राणे सार्वजनिक मंचावरून तसेच माध्यमातून माझ्याविषयी आणि शिवसेने बाबत बिनबुडाचे आरोप करीत असतात.हे आरोप त्यांनी सिध्द करावेत. अन्यथा माफी मागावी.माझे वकील सार्थक शेट्टी यांच्या मार्फत मी त्यांना कायदेशीर कारवाई बाबत नोटीस बजावली आहे. कर नाही तर डर कशाला? जय महाराष्ट्र!”

 

 

 

Related posts

दाऊदला कुठल्याही परिस्थितीत भारतात आणावे, रोहित पवारांची पंतप्रधानांना विनंती

News Desk

मंत्री आदित्य ठाकरेंनी मेट्रो कारशेड जागेची केली पाहणी

News Desk

मनसेच्या वर्धापनदिनानिमित्त ‘अरुणोदय झाला’ गाणे राज ठाकरेंनी केले ट्विट

swarit